आयुक्तांची माहिती : कामकाज करणार सुरळीतअमरावती : पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलिसांना ठाण्यातील कामकाज करता यावे, या उद्देशाने मुख्यालयातील पोलिसांना ठाण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी दिली. पाच वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत पोलिसांचे बदलीसत्र सुरू असून पुढच्या दोन ते तीन दिवसांत पोलिसांच्या बदलीचे आदेश काढण्यात येणार आहेत. यामध्ये विविध पोलीस ठाण्यांत कार्यरत पोलिसांच्या बदल्या केल्या जातील. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती अर्ज सादर करून बदल्या मागितल्या आहेत, त्यांनी पोलीस आयुक्तांसमोर हजेरी लावून इच्छित स्थळाविषयी सांगितले आहे. सन २००६ पासून रुजू झालेले ८० ते ९० पोलीस कर्मचारी मुख्यालयातच सेवारत आहेत. यामधील काही कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात पाठविण्यात येणार आहे. या पोलिसांना प्रत्येक विभागातील कामकाज करता यावे, यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी हे पाऊल उचलले आहे. वाहतुुकीकडे वेधले लक्ष शाळा-महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांना दिल्यात. जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी आणि दूरसंचार विभागांनी खोदलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजविण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच शहरातील पार्किंग व्यवस्था व वाहतूक नियंत्रणासाठी मुख्य मार्गावर पिवळे पट्टे, झेब्रा कॅ्रासिंग लावण्यात यावेत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)पोलीस मुख्यालयातील कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच जागी अनुभव घेत आहे. त्यांनाही ठाण्यातील कामकाजाचा अनुभव हवा, त्याकरिता मुख्यालयातील पोलीस ठाण्यात पाठविणार आहे. - दत्तात्रय मडंलीक, पोलीस आयुक्त.
पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलिसांना ठाण्यात पाठविणार
By admin | Updated: May 24, 2016 00:34 IST