शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगानंतर पोलिसाची मुलीला मारहाण

By admin | Updated: September 3, 2016 00:04 IST

पोलिसाने एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला.

हंसराज कॉलनीतील घटना : गाडगेनगर ठाण्यात गुन्हा दाखल अमरावती : पोलिसाने एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. शैलेश दीपक वानखडे (२५,रा. एकविरा नगर) असे आरोपीचे नाव असून तो ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती सूंत्रानी दिली. शहरातील एका १७ वर्षीय मुलगी ही शिक्षण घेत असताना आरोपी शैलेश वानखडे हा तिचा पाठलाग करायचा. वर्षभरातून तो तिचा मागोवा घेत दररोज टॉटिंग करून छेड काढायचा. वाईट नजरेने पाहून तिला हातवारे करायचा. याबाबत मुलीने शैलेशला हटकले, मात्र, त्याचे हे कृत्य सुरूच होते. गुरुवारी पुन्हा ती मुगली शिकवणी वर्गाकरिता जाताना शैलेशने तिला रस्त्यात अडवून छेड काढली असता दोघांत वाद झाला. मात्र, यावेळी शैलेशने तिच्या श्रीमुखात लगावली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्यासह गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३५४ (ड)(अ), ३२४, ५०६, ५०४, पॉक्सो १२ नुसार गुन्हा नोंदविला असून पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहे. पीडित मुलीला भाजपा पदाधिकाऱ्यांकडून सहकार्यपीडित मुलीवर अत्याचारांची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस विभागाला याबाबत कळविले. पीडित मुलीला सहकार्य करीत तिच्या तक्रारीची दखल घेण्यास सांगितले. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनीही तत्काळ दखल शैलेश वानखडेविरुध्द गुन्हा नोंदविला. पोलीस आयुक्तांचे विशेष लक्ष पोलिसाने मुलीची छेड काढल्याचे माहिती पडताच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तत्काळ दखल घेत गाडगेनगर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष केंद्रित केले. आरोपीला अटक करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेलासुध्दा दिले आहे.