शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 22:57 IST

मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू : सिटीझन कॉप ठरणार गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असून आता हा उपक्रम राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंमलात आणला असून फिरते पोलीस ठाणे हे ‘रोल मॉडेल’ ठरल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.फिरते पोलीस ठाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. राज्यात आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना नाही. गावात कुणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु पोलीस अधीक्षक साहू यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणेच जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प करून हा उपक्रम सुरू केला.भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहान मोठ्या गावात फिरते पोलीस ठाणे पथक जावून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतात.या तक्रारींचे निराकरण त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत शंभराच्यावर गावात हे फिरते पोलीस ठाणे पथक पोहोचले आणि नागरिकांच्या हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले. हा उपक्रम आजही सुरूच आहे. दरम्यान, या उपक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना गौरविले होते.अवैधधंदेमुक्तीसाठी धाडसत्रभंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री, घरफोडी, वाहनचोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून २०१६ मध्ये खूनाच्या २३ घटना घडल्या होत्या त्यापैकी २० घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली.दरोड्याचे दोन आणि घरफोडीचे ३९, सोनसाखळी पळवून नेल्याच्या आठ घटना उघडकीस आणले आहेत. त्यापूर्वी आयपीलच्या धाडीत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी निसंकोचपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही केले आहे.‘निर्भय बनो’ उपक्रमाला प्रतिसादशिक्षण घेण्याच्या वयात केवळ आमिषांचे प्रलोभन दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात समज नसलेल्या लहान मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही उपविभागातील शाळांमधील कार्यशाळा घेऊन विद्यार्थिनीमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत ज्या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन हा विषय समजून घेतला त्यांना इतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी यशदाचे प्रशिक्षक, डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्वांना आमंत्रित केल्याचे विनिता साहू यांनी ‘सांगितले.‘टेक-एक्स्पो’च्या माध्यमातून जनजागृतीभंडारा जिल्ह्यातील जनतेला सायबर गुन्हेगारीची माहिती होऊन जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस मैदानावर टेक-एक्सपो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय वाहन चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात न जाता घरबसल्या करता यावी, यासाठी ‘सीटीझन कॉप’ याविषयी जनजागृती करण्यात आली. आता तर दरवर्षी टेक एक्सपो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात अत्याधुनिक सायबर सेलचे कामकाज अवघ्या सहा दिवसात पूर्ण करण्यात आले होते. याच तंत्राचा वापर करून कुख्यात वाघ तस्कर कुट्टू पारधीला अटक करण्यात मदत झाल्याचे साहू यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.