शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

पोलीस तपासात बालरोगतज्ज्ञाची मदत घेणार

By admin | Updated: June 8, 2017 00:07 IST

डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात झालेल्या चार नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात तपासाला गती मिळण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची मदत घेतली जाणार आहे.

पीडीएमसीतील चार नवजात शिशुंचे मृत्यू प्रकरण : जिल्हा शल्यचिकीत्सकांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात झालेल्या चार नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात तपासाला गती मिळण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची मदत घेतली जाणार आहे. यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक अरुण राऊत यांना पत्र पाठविले आहे. पीडीएमसीतील नवजात शिशुंच्या मृत्यू प्रकरणात व्हिसेरा अहवाल अद्यापपर्यंत पोलिसांना प्राप्त झाला नाही. व्हिसेरा अहवालातून त्या तीनही शिशुंच्या मृत्युचे निश्चीत कारण समोर येणार आहे. याप्रकरणात गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर चौकशी करीत आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील या गुन्हेविषयक प्रकरणाच्या तपासाकार्यात बाधा निर्माण होऊ नये, या जटील प्रकरणात तपासात अडसर निर्माण होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ डॉक्टराची तपास कार्यात मदत व्हावी, या दृष्टीने पोलिसांना बालरोग तज्ज्ञांची गरज आहे. या घटनेच्या अनुषंगाने सीएस अरुण राऊत यांच्या डॉक्टरांच्या चमुने एनआयसीयुची तपासणी करून अहवाल तयार केला. त्यात त्यांना एनआयसीयुत अनेक त्र्युटा आढळून आल्या आहेत.नायब तहसिलदारांचे पोलिसांना पत्रचांदुरबाजार येथील आफरीन बानो यांच्या मृत शिशुचे शवविच्छेदन करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, चांदुरबाजारातील कब्रस्थानात आफरीन यांच्या शिशुचा मृतदेह कोणत्या ठिकाणी दफन केला आहे. ही बाब जाणून घेण्यास मृत शिशुचे पालक उपस्थित असणे गरजेचे आहे. आफरीन बानो व त्यांचे पती हे मध्यप्रदेशात गेले असून त्यांच्याशी नायब तहसीलदार व पोलिसांचा संपर्क अद्यापपर्यंत झाला नाही. त्यामुळे त्यांच्या परवानगी व उपस्थितीशिवाय शिशुचे शवविच्छेदन होणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात नायब तहसिलदारांनी गाडगेनगर पोलिसांना पत्र पाठवून कळविले आहे. डॉ. राजेंद्र निस्तानेची चौकशी होणारपीडीएमसीच्या बालरोग विभागाचे प्रमुख बालरोग तज्ज्ञ राजेंद्र निस्ताने यांच्याकडे एनआयसीयुची जबाबदारी होती. घटनेच्या दिवशी निस्ताने यांची ड्युटी सुध्दा होती. मात्र, ते उपस्थित नव्हते. उलट त्यांनी अनधिकृतपणे रजा घेतल्याचे पीडीएमसी प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले. याप्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नसला तरी, ते घटनेची माहिती मिळाल्यावर का आले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात पोलीस विभागाकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांकडून निस्ताने यांना बोलाविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली आहे. चौकशीअंती कारवाईची दिशा ठरेल, असे मंडलिक म्हणाले.दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज सादर : तीन नवजात शिशुंच्या मृत्युप्रकरणातील आरोपी डॉ. कट्टा व परिचारिका विद्या थोरात यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. त्यांनी वकीलमार्फत न्यायालयात जामीन अर्ज सादर केला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ८ जून रोजी "से" दाखल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडकर यांनी दिली.