शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘डोमा’ नाक्यावर पोलीस तैनात

By admin | Updated: July 30, 2016 00:08 IST

तालुक्यात सोमवारी भरणाऱ्या गांगरखेडा येथील आठवडी बैल बाजाराची दखल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतली असून ...

तस्करीला चाप : गांगरखेडा बैलबाजाराची पोलिसांकडून दखलचिखलदरा : तालुक्यात सोमवारी भरणाऱ्या गांगरखेडा येथील आठवडी बैल बाजाराची दखल जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतली असून परिसरात रात्रीला गस्त आणि वन विभागाच्या डोमा येथील नाक्यावर पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे. गांगरखेडा येथे सोमवारी बैलबाजार भरतो. येथे मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी गुरे विकायला आणतात तर व्यापरी मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी करून त्याची कत्तलखान्याकडे रवानगी करीत असल्याचे चित्र होते. त्याविरुद्ध सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर सोमवारी (२५ जुलै रोजी) परिसरातील युवकांनी आठवडी बाजार उधळून लावला होता. याची कुणकुण व्यापाऱ्यांना लागतच पहाटे ५ वाजता त्यांनी परिसरातून पोबारा केला होता. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र युवकांनी आपला मोर्चा थेट काटकुंभ पोलीस चौकीकडे वळवून जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांकरिता लेखी निवेदन दिले होते. त्यामध्ये गांगरखेडा येथे भरणाऱ्या आठवडी बाजारातून कत्तलखान्यात व्यापाऱ्यांकडून जाणाऱ्यांना गुरांना वाचविण्यासह भविष्यात मोठा अनर्थ घडण्याचे भाकीत वर्तविले होते. (प्रतिनिधी)मध्यप्रदेशात बंदी, स्थानिकांना हप्तामध्यप्रदेशच्या सावलमेंढा बैतूल बाजार, शिवणी आदी ठिकाणी भरणाऱ्या गुरांच्या बाजारावर बंदी घालण्यासोबत गौमांस व अवैध कत्तलखान्याविरुद्ध बंदी आहे. परिणामी तेथील व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा गांगरखेड्याकडे वळविला होता. आता या आठवड्यापासून त्यालाही चाप बसला आहे. दुसरीकडे चिखलदरा पोलीस या आदेशाचे किती दिवस तंतोतंत पालन करतात, यावरच नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. पोलीस अधीक्षकांकडून दखलजिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी गांगरखेडा येथील बैलबाजाराच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली. सोमवारी रात्री व दिवसा आणि मंगळवारी परिसरात गस्त घालण्यासह डोमा येथील वनविभागाच्या नाक्यावर एक पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याचे आदेश दिल्याचे निवेदनकर्त्यांकडून सांगण्यात आले.