शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या धाकात तरूणाईचा ‘प्रेम दिन’

By admin | Updated: February 15, 2017 00:01 IST

‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरातील तरूणाई उत्सुक असली तरी पोलिसांच्या करड्या नजरेखाली तरूणांना जीव मुठीत घेऊन ‘प्रेम दिन’ साजरा करावा लागला.

हिरमोड : वडाळी-छत्री तलाव, बांबू उद्यानातही फिरल्या पोेलीस व्हॅन, हॉटेल्स, कॉफी शॉप फुल्ल अमरावती : ‘व्हॅलेन्टाईन डे’ साजरा करण्यासाठी नेहमीप्रमाणे शहरातील तरूणाई उत्सुक असली तरी पोलिसांच्या करड्या नजरेखाली तरूणांना जीव मुठीत घेऊन ‘प्रेम दिन’ साजरा करावा लागला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध कॉफी शॉप, आईस्क्रीम सेंटर व शहरातील नामांकीत हॉटेल्समध्ये आपापल्या पार्टनर्सला भेटून प्रेमभावना व्यक्त केल्यात. वास्तविक एरवी शहरातील वडाळी तलाव, छत्री तलाव आणि वडाळी तलाव परिसरातील बांबू उद्यानात प्रेमीयुगुलांचा राबता असतोे. मात्र, मंगळवारी याठिकाणी पोलिसांनी गस्त वाढविल्याने जोडपी याठिकाणी फिरकलीच नाहीत. परंतु शहरातील क्रीडा संकुल, राजापेठ, कॅम्प, राजकमल चौकातील व काही कॉफी शॉप व आईस्क्रीम सेंटर्समध्ये तरूणाईची गर्दी दिसून आली. याठिकाणी जोडप्यांकरिता बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच हार्टच्या आकारचे फुगे व अन्य रोषणाई करून कॉफी शॉप वेगळ्या पद्धतीने सजविण्यात आले होते.विवाहित जोडप्यांचा ग्रिटिंग कार्डस्वर भरअमरावती : अनेक विवाहित जोडप्यांनी सुद्धा त्यांच्या पार्टर्नरसमवेत हा दिवस उत्साहाने साजरा केला. भेटवस्तुंची बाजारपेठ व्हॅलेन्टाईन सप्ताह सुरू होताच गजबजू लागते. एक-एक विशिष्ट दिवस साजरा करताना आपापल्या पार्टनर्सला वेगवेगळ्या वस्तू भेट देण्याचे फॅडच तरूणाईमध्ये निर्माण झाल्याने दुकानदारांनीही वेगवेगळ्या संकल्पना अंमलात आणून चित्ताकर्षक भेटवस्तू बाजारात उपलब्ध केल्या होत्या. मात्र, सोशलमिडियाच्या या जमान्यातही प्रेमवीरांचा शुभेच्छा कार्ड खरेदीकडे असलेला ओढा काही कमी झालेला नाही. विवाहित जोडप्यांनी ग्रिटिंग्स कार्ड खरेदीवर विशेष भर दिला. बजरंग दलाने पकडले सहा प्रेमीयुगुलबजरगं दलाचे महानगर संयोजक निरंजन दुबे, बंटी पारवानी, डियुक्स गोदवानी, प्रिदेव डेंढवाल, आर्यन देवकर, श्रीरंग वडनेरकर, सिद्धू सोळंकी व पवन श्रीवास यांनी मंगळवारी शहरात फिरून प्रेमीयुगुलांवर लक्ष केंद्रित केले होते. दरम्यान मालटेकडीवरील पाच प्रेमीयुगुलांना त्यांनी ताब्यात घेतले. तसेच वडाळी बगिच्यातील एका पे्रमीयुगुलाला ताब्यात घेऊन फे्रजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. शिकवणीवर्गांच्या बाहेरही धूमशहरातील राठीनगर, गाडगेनगर, राधानगर, राजापेठ, रुख्मिणीनगर परिसरात सर्वाधिक शिकवणी वर्ग आहेत. अल्पवयीन विद्यार्थ्यांची या शिकवणीवर्गाच्या बाहेर धूम पाहायला मिळाली. याठिकाणी मुला-मुलींचे घोळके आढळून आले. शहरातील निवडक पानटपऱ्यांवर सुद्धा तरूणाईची गर्दी दिसून आली. सायंकाळी गाडगेनगर परिसरात तरुणाईने हा दिवस उत्साहात साजरा केला. मात्र, पोलिसांचा जबरदस्त वचक असल्याने अनेक तरूणांचा विरसही झाला. दामिनी पथक तैनातव्हॅलेन्टाईन डे साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये किंवा नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता सर्वच पोलीस ठाण्यांचे पोलीस तैनात करण्यात आले होते. दामिनी सुरक्षा पथकाने सुध्दा प्रेमीयुगुलांचे व महाविद्यालयीन तरुणांच्या अड्ड्यावर नजर ठेवली. तसेच मोबाईल व्हॅनमधील पोलीस तसेच साध्या वेषातील पोेलीस सुद्धा तैनात करण्यात आले होते. गुलाब महागला एरवी पाच ते दहा रुपयांना मिळणाऱ्या गुलाबाची मंगळवारी चक्क १५ ते २० रुपयांना विक्री झाली. मंगळवारी फुलांच्या बाजारपेठेत वेगळीच रंगत दिसून आली. पुण्याच्या व शिर्डीच्या ‘डोज’ गुलाबाला सर्वाधिक मागणी होती. त्याकरिता मागणीच्या २० टक्के अधिक गुलाब बाजारपेठेत विक्रीसाठी आले होते. पांढरा व पिवळा गुलाब सुद्धा विक्रीस आला होता. परंतु लाल गुलाबाला सर्वाधिक मागणी होती. शहरातील २५ फुले विक्रेत्यांची गुलाबाची फुले लाखोंच्या संख्येने विकली गेली. काही दिवसांपासून मंदावलेली फुलांची बाजारपेठे मागील दोन दिवसांत गजबजली. व गुलाबांची मागणी वाढल्याचे फुलविक्रेते अरुण गुल्हाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.