शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

रोडरोमिओविरूद्ध पोलिसांनी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:34 IST

शहरात रोडरोमिओंचा उच्छाद थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याचा अचलपूर पोलिसांनी निर्णय घेतला. या मुद्द्यावर सामाजिक संघटनाही सरसावल्या असून, योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.

ठळक मुद्देदामिनी पथकाची निर्मिती : सामाजिक संघटनाही सरसावल्या

आॅनलाईन लोकमतअचलपूर : शहरात रोडरोमिओंचा उच्छाद थांबविण्यासाठी दामिनी पथक कार्यान्वित करण्याचा अचलपूर पोलिसांनी निर्णय घेतला. या मुद्द्यावर सामाजिक संघटनाही सरसावल्या असून, योग्य पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘लोकमत’ने हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता.‘अचलपूर परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच अचलपूर, परतवाडा पोलीस खडबडून जागे झाले. सध्या परीक्षेचा काळ आहे. यादरम्यान परीक्षा केंद्रावर अचलपूर, परतवाडा परिसरात रोडरोमिओंचा सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावर तसेच आॅटोरिक्षा, एसटी बस थांब्यावर विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अचलपूर, परतवाडा पोलिसांनी रोडरोमिओ, चिडीमारांविरूद्ध कडक कारवाई करण्याकरिता ‘दामिनी पथक’ची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक महिला व एक पुरुष पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सकाळच्या वेळेस शिकवणी वर्गाला जाणाऱ्या विद्यार्थिनींना दामिनी पथक मदत करणार आहे.विद्यार्थिनींनी कोणताही दबावाला बळी न पडता छेडखानी झाल्यास त्वरीत पोलिसांना सूचना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.हेल्पलाईनची बैठकयासंदर्भात हेल्पलाइनसुद्धा सक्रिय झाली आहे. सदस्यांची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे सांगितले.