अमरावती : शाळकरी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन दक्ष असून सोमवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात जिल्हा स्कूल बस समितीची बैठक पार पडली. जिल्हा स्कूल बस समितीच्या बैठकीत आरटीओ श्रीपाद वाढेकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, शिक्षणाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, मुख्याध्यापक तसेच बस आगार प्रमुख उपस्थित होते. बैठकीत शाळकरी मुलांच्या प्रवासी वाहतुकीसदंर्भात सुरक्षा उपाययोजनेबाबत चर्चा करण्यात आली. विविध विषयावर चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात आले आहे. स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेस्कूल बसमध्ये होणारे अवैध प्रकार टाळण्यासाठी स्कूल बसच्या काचावर आता काळ्या फिल्म लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात याव,े असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. ओव्हरलोड शहर बसवर कारवाईमहापालिकेकडे ३४ शहर बसच्या प्रवासी वाहतुकीची जबाबदारी आहे. शहरात सर्रारपणे क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने शहर बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. आॅटो चालकांना ड्रेस अनिवार्यशहरात पाच हजारांच्यावर आॅटो प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामध्ये अनेक आॅटो चालक ड्रेस व बॅचचे नियम न पाळता सर्रास वाहतूक करीत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आॅटो चालकांना ड्रेस व बॅच अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ग्रामिण भागातील आॅटोलाही शहरातून हद्दपार करण्यात येणार आहे. बैठकीत शाळकरी मुलांच्या सुरक्षेवर मंथन करण्यात आले. अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.
शाळकरी मुलांच्या सुरक्षेबाबत पोलीस प्रशासन दक्ष
By admin | Updated: December 22, 2014 22:39 IST