शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विष पाजून तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 23:07 IST

जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देनातेवाईकांचा आरोप : राजापेठ, कोतवाली ठाण्यातील पोलिसांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. नितीन राजापेठ स्थित भोंगाडे कॉम्प्लेक्स येथे सोमवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आल्याने आरोपींविरुद्ध मृताच्या नातेवाईकांनी राजापेठ व कोतवली पोलिसांत तक्रार देऊन कारवाईच्या मागणीसाठी रोष व्यक्त केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती.१ फेबुवारी रोजी नितीन सारसर हा कारंजा लाड येथील एका लग्नासमारंभात गेला असता, त्याचे मनोज संगेलसोबत भांडण झाले होते. याचा वचपा काढण्याच्या इराद्याने रविवारी रात्री मनोजने नितीनला गांधी चौकात बोलावले. त्यावेळी नितीन मित्र मधुसूदन निदांणेला सोबत घेऊन गांधी चौकात पोहचताच मनोज व त्याच्या साथीदारांनी त्यांना मारहाण केली. दरम्यान मधुसूदन तेथून पळाला. मात्र, मनोज व त्याच्या साथीदारांनी नितीनला पकडून कोठेतरी घेऊन गेल्याचे मधुसूदनने तक्रारीत म्हटले आहे. नितीन रात्री घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध त्याचा चालविला. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास नितीन बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी कोतवाली पोलिसात नोंदविली. त्यानंतर सोमवारी सकाळी नितीन सारसरचा मृतदेह भोंगाडे कॉम्प्लेक्स स्थित युवा स्वाभिमानीच्या कार्यालयासमोर पडलेला दिसून आला. नितीनच्या तोंडातून फेस निघत असल्याचे आढळून आले. घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी नितीनचा मृतदेह इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, नितीनच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरली. त्याच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. नितीनची हत्या केल्याचा आरोप करीत पोलीस ठाण्यात रोष व्यक्त केला. नितीनशी वादाची सुरुवात गांधी चौकात झाल्यामुळे नातेवाईकांनी मोर्चा कोतवाली ठाण्याकडे वळविला. तेथेही नातेवाईकांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली होती.मनोज संगेलनेही केली होती तक्रारगांधी चौकात नितीन सारसर व मनोज संगेले यांच्यात वाद झाल्यावर मनोज कोतवाली पोलीस ठाण्यात पोहोचला होता. त्याने नितीनविरुद्ध तक्रार नोंदविली. नितीनने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने मारहाण केल्याचा आरोप मनोज याने नितीनवर केला. याप्रकरणात कोेतवाली पोलिसांनी नितीन सारसरविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०६, ५०४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.मारहाण करुन विष पाजल्यामुळे नितीनचा मृत्यू झाला, अशा तक्रारीवरुन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.- शशिकांत सातव, पोलीस उपायुक्त