शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विष घेतलेल्या तरुणाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू, डॉक्टरवर हलगर्जीपानाचा आरोप, नातेवाईक संतप्त

By प्रदीप भाकरे | Updated: June 23, 2024 23:39 IST

रुग्णालयाला पोलीस छावणीचे स्वरूप  

प्रदीप भाकरे, अमरावती : येथील राजापेठस्थित एका खाजगी रुग्णालयात रविवारी रात्री आठच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी 12 वाजतापासून रात्री आठ वाजेपर्यंत दवाखान्यातील वीज पुरवठा खंडित असल्याने त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तो दगवाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी आक्रोश केला. परिणामी राजापेठ पोलिसांना धाव घ्यावी लागली. रात्री 11 पर्यंत तो तणाव निवळलेला नव्हता.            

तुषार रमेशसिंह चव्हाण (वय 23 वर्ष, रा. बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. परवा त्याने विषारी द्रव्य घेतल्याने त्याला नजीकच्याच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवार सकाळपासून विद्युत पुरवठा खंडित झाला.जेनरेटरच्या दुरुस्तीमध्ये अनेक तास वाया गेले. अशात तो रात्रीच्या वेळी दगावला. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात चांगलाच रोष व्यक्त केला. आमदार रवी राणा यांचे बंधू सुनील राणा व माजी नगरसेविका राधा कुरील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही ऐकायला तयार नसल्याने राजापेठ पोलिसांना पाचारण  करावे लागले.

संबंधित डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत आपण मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा घेतल्याने रुग्णालयातील तणाव वृत्त लिहिसतोवर निवळलेला नव्हता. बेलपुरा येथील तरुणाई व नातेवाईकांनी मोठा रोष व्यक्त करत तेथे गर्दी केली आहे. राजापेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे त्याने आत्महत्या का केली, ते कारण शोधून संबंधितंवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णालयाबाहेर अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल