शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन केलेल्या रुग्णाला वाऱ्यावर सोडले

By admin | Updated: March 14, 2016 00:02 IST

विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील रूग्णाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने ...

दुर्लक्ष : वैद्यकीय अधिकाऱ्याविरूध्द तक्रारशेंदूरजनाघाट : विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील रूग्णाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने रूग्णाला आरोग्य केंद्राबाहेरच ताटकळत ठेवण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार असलेल्या महिला आरोग्य अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रूग्णाला दोन तासांनंतर उपचार मिळाले. काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष सतीश अकर्ते यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. विस्तृत माहितीनुसार, येथील नीळकंठ शेषराव काळे (५४) यांनी विष प्राशन केल्याने १२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास सतीश अकर्ते यांनी त्यांना गंभीर अवस्थेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी सिरसाम रजेवर होते. त्यांचा प्रभार अर्चना डहाके यांच्याकडे होता. मात्र, त्या आरोग्य केंद्रात उपस्थित नव्हत्या. त्यावेळी केंद्रात फक्त दोन नर्सेस उपस्थित होत्या. काही वेळ तर विष प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेतील नीळकंठ काळे यांना रूग्णालयातच घेतले गेले नाही. त्यामुळे सतीश अकर्ते यांनी नगर परिषद सदस्यांना ही ही बाब कळविली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पालिका उपाध्यक्ष जयप्रकाश भोंडेकर, न.प. सदस्य धनराज अकर्ते, देवानंद जोगेकर, ताराचंद सोमकुंवर, नगराध्यक्षांचे पती अरुण खेरडे, संजय बेले आदी आरोग्य केंद्रात पोहोचले. त्यांनी दूरध्वनीवरून प्रभारी वैद्यकीय अधिकारी अर्चना डहाके यांना पीएचसीला येण्याची विनवणी केली. त्यावर त्यांनी रूग्णाला पीएचसीच्या गाडीमध्ये वरूडला रेफर करा, असे उर्मट भाषेत सांगितल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. घटनेच्या आदल्या दिवशी प्रभारी डॉक्टरांनी रात्रपाळीत काम केले. दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या लवकरच रुग्णालयात आल्या. परंतु दुपारच्यावेळी त्या जेवणासाठी निवासस्थानी गेल्या असता त्यांना एक तास उशीर झाला. यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. - अमोल देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी