शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा-चिरोडी जंगलाची इको टुरिझमकडे वाटचाल

By admin | Updated: February 12, 2017 00:03 IST

पोहरा, चिरोडी, मालखेड जंगलातील पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता ...

प्रस्ताव प्रक्रियेला सुरुवात : वनाधिकाऱ्यांकडून पाहणीवैभव बाबरेकर अमरावतीपोहरा, चिरोडी, मालखेड जंगलातील पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी इको टुरिझम विकसित करण्याची संकल्पना अमरावती वनविभागाने मांडली आहे. यासंबंधी शुक्रवारी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जंगलातील आकर्षित स्थळांची पाहणी करून नियोजन सुरू केले आहे. तसा प्रस्तावही तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. देशभरातील विविध राज्यांमधील काही ठिकाणी जंगलाचा भाग असून काही ठिकाणचे जंगल इको टुरिझमच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी पर्यटकांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल म्हटले की पर्यावरणपूरक वातावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे ठिकाण लक्ष्यात येते. शहरातील नागरिकांना जंगल व वन्यप्राण्यांविषयी एक विशेष आकर्षण आहे. जंगल भ्रमंती करून वन्यप्राण्याचा मुक्त संचार पाहण्याचा छंदसुद्धा अनेकांनी बाळगला आहे. जंगलाला पर्यटन स्थळ म्हणूनदेखील आज ओळखले जात आहे. देश-विदेशातील अनेक जण इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेतात. जंगलातील नैसर्गिक वातावरणात राहणे व जंगल भ्रमंती करून वन्यप्राण्यांना पाहणे, ही बाब पर्यटकांना आकर्षित करणारेच ठरते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटचे जंगल हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. त्यादृष्टीने अमरावती शहरालगत असणाऱ्या जंगलाला पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होऊ शकतात. पोहरा, चिरोडी व मालखेड या जंगलातसुद्धा विविध वन्यप्राणी व जैवविविधता आहे. वाघ, बिबट, हरिण, मोर आदीे अनेक वन्यजीव नागरिकांच्या अनेकदा दृष्टीस पडत आहेत. त्याअनुषंगाने या जंगलात इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल भ्रमंती, हे विशेष आकर्षण ठरू शकते. त्यादृष्टीने आता अमरावती वनविभागाने पाऊल उचलले आहे. व्याघ्र दर्शनाची उत्सुकता वाढणारवाघ पाहण्यासाठी देश-विदेशीतून अनेक पर्यटक भारतभरातील विविध जंगलात भ्रमंतीला येतात. पेंच-ताडोबाच्या जंगलात अनेकांना सहजरीत्या वाघाचे दर्शन घडते. पोहरा-चिरोडी जंगलात पट्टेदार वाघाचे वास्तव्य आहे. वनविभागाने त्याची पुष्टीसुद्धा केली आहे. त्यातच इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटनाची सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांची गर्दी वाढणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे व्याघ्र दर्शनच राहणार आहे. स्थानिकांना मिळणार रोजगाराची संधीशहरालगतच्या जंगलात इको टुरिझमच्या माध्यमातून पर्यटन सुविधा उपलब्ध झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पर्यटकांची गर्दी वाढल्यास गावखेड्यांतील नागरिकांचे व्यवसायसुद्धा फुलणार आहेत. त्या दृष्टीनेही वनविभाग विचारधीन आहे. इको टुरिझमच्या माध्यमातून जंगल भ्रमंती व नेचर वॉक करण्यास पोहरा-चिरोडी जंगल चांगले आहे. हा प्रस्ताव विचाराधिन असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे - हेमंतकुमार मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती वनविभाग