शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजारच्या क्रीडा संकुलाची दुर्दशा

By admin | Updated: November 30, 2015 00:34 IST

ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व इतर सोई मिळाव्या यासाठी शासनाने तालुकास्तरावर लाखो रूपये खर्चून क्रीडा संकुले निर्माण केली आहे.

चोरट्यांना मोकळे रान : लोखंडी गेट चोरण्याचा प्रयत्नचांदूरबाजार : ग्रामीण भागातील युवकांना खेळण्यासाठी सुसज्ज मैदान व इतर सोई मिळाव्या यासाठी शासनाने तालुकास्तरावर लाखो रूपये खर्चून क्रीडा संकुले निर्माण केली आहे. परंतु क्रीडा अधिकाऱ्यांचा दुर्लक्षतेमुळे येथील क्रीडा संकुलाची दुर्दशा झालेली आहे. मोर्शी मार्गावर उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची इमारत तयार होऊन ११ वर्षे झालेली आहे. या क्रीडा संकुलात लाकडी बॅडमिंटन कोर्ट, व्यायामशाळा, खेळाडुंना खेळण्याकरिता खुले मैदान, धावपट्टी उभारण्यात आली आहे. मात्र व्यायामशाळेचे साहित्य हे एका बंद खोलीतच पडून आहे तर नवीनच बनविण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टवर पॉलीशची नितांत आवश्यकता आहे. परंतु या भव्य अशा क्रीडा संकुलाला देखरेखीकरिता कोणाचीही नियुक्ती नाही तर या लाखो रूपयांची संपत्तीचा कोणीही चौकीदार सुद्धा नाही. त्यामुळेच या इमारतीत नेहमीच आंबटशौकिनाचे वास्वव्य असते. या क्रीडा संकुलामध्ये दररोज शेकडो खेळाडू सकाळी ५ वाजतापासूनच मैदानावर खेळण्याकरिता जातात. त्यामुळे या मैदानावर सर्वदूर अंधारच असतो तर बॅडमिंटन मैदानावर मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असल्याने खेळाडुंना आल्याबरोबर हॉलची साफसफाईच करावी लागते. या क्रीडा संकुलाची अतिशय दयनीय अवस्था असून येथे पिण्याकरिता पाण्याची व्यवस्था नसून शौचालयात सर्वत्र घाणीचे वातावरण आहे. येथील वॉश बेसीनसुद्धा गायब असून बोरींगची व्यवस्थाही फक्त नावापुरतीच करण्यात आली आहे. येथील बोरींगला विद्युत जोडणी सुद्धा करण्यात आली नाही. तसेच मागील दरवाजा सुद्धा तोडण्यात आला असून पायऱ्यांची टाईल्स सुद्धा तुटली आहे.आमदारांची वेळोवेळी मदतआ. बच्चू कडू यांनी या क्रीडा संकुलाला सुरक्षा भिंत बांधण्याकरिता लाखोचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच वेळोवेळी या क्रीडा संकुलाला लाकडी बॅडमिंटन कोर्ट, टिन शेड, स्वच्छतेसाठी निधीची मदत केली. मात्र काही कामचुकार अधिकारीमुळेच या क्रीडा संकुलाची दुर्दशा होत आहे. याकरिता आमदार बच्चू कडूंनी कठोर पवित्रा घ्यावा, अशी मागणी नागरिकांतर्फे होत आहे. (तालुका प्रतिनिधी)