शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीओ' इमारतीची दुर्दशा

By admin | Updated: September 1, 2016 00:24 IST

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीला जागोजागी भगदाडे पडली आहेत. छतामधून पाण्याची गळती होते,

३३ वर्षांत इमारत जीर्ण : आवारात पाण्याचे डबके, कचऱ्याचे ढिगारेमनीष कहाते अमरावतीयेथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीला जागोजागी भगदाडे पडली आहेत. छतामधून पाण्याची गळती होते, कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. कार्यालयातील फर्निचर मोडके, तोडके झाले आहे. परिसरात पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे कार्यलयाची अवस्था गुरांच्या गोठयासारखी झाली आहे.येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय एकाच इमारतीत आहे. १९८३ साली इमारतीचे बांधकाम झाले आहे. संपूर्ण कार्यालयातील स्लॅबला गळती लागली आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने तीन महिन्यांपूर्वीच छताची गळती थांबविण्यासाठी प्लास्टर केले, हे विशेष. इमारतीच्या संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत. कार्यालयासमोरच पाण्याचे भलेमोठे डबके साचले आहेत. कार्यालयासमोर झेंड्याच्या बाजुला कचऱ्याचा ढिगारा लागला आहे. पार्किंगची जागा निश्चित झाली आहे. तरी वाहने अस्ताव्यस्त दिसून येतात. दुचाकी वाहनतळाजवळ रेतीचा ढीग आहे. शिकाऊ उमेदवारासाठी गाडी चालविण्याकरीता असलेल्या रस्त्यावरील लोखंडी कठडे तुटलेले आहेत. इमारतीच्या आजुबाजुला गवत वाढले आहे. परिसरातील डांबरी रस्त्यावरचे डांबर उडाले आहे.कार्यालयाच्या दोन मजली इमारतीमध्ये मोडलेले फर्निचर अस्तव्यस्त पडलेले आहे. पान खाऊन थुंकल्याच्या पिचकाऱ्या जागोजागी भिंतीवर दिसून येतात. इलेक्ट्रीकची फिटिंग पूर्णपणे उखडली आहे. केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहनाच्या कागदपत्राचे रजिस्टर देखील जीर्ण झाले आहे. रजिस्टर ठेवलेल्या आलमाऱ्या तुटलेल्या आहेत. वाहनधारकांच्या विविध कामांकरिता ३८ काचा लावलेल्या खिडक्या आहेत. काचाही फुटलेल्या आहेत. त्यावर धूळ पसरलेली आहे. कार्यालयातील १५ टेबल आणि खुर्च्या मोडलेल्या आहेत. एकूण २९ कर्मचारी कार्यालयात कामाला आहेत. परंतु ते कधीच वेळेत कार्यालयात हजर नसतात. कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे दालन सोडले तर कुठेही स्वच्छता दिसत नाही. कार्यालयातील अर्धेअधिक लाईट, पंखे बंद अवस्थेत आहेत. टेबलावरच्या चादरी, खुर्चीवरच्या उशा गेल्या कित्येक वर्षापासून धुतल्या नसल्याने सर्वत्र डाग पडलेले आहेत. चादरीही फाटलेल्या आहेत. उशांचे फोम कापडाच्या बाहेर निघाले आहेत. कार्यालयाच्या इमारतीचा रंग उडाला आहे. खुर्च्यांवर रजिस्टर ठेऊन कर्मचारी बसत आहेत. अशी विदारक स्थिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाची झाली आहे.