शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आडजात वृक्ष कटाईला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:04 IST

वनविभागाच्या नोंदी आडजात वृक्ष कटाईला मनाई असली तरी वडाळी परिक्षेत्र वगळता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाईला उधाण आले आहे.

ठळक मुद्देवनाधिकाऱ्यांची मूक संमती : परतवाडा, अचलपूर, चांदुरात धूम

आॅनलाईन लोकमतअमरावती : वनविभागाच्या नोंदी आडजात वृक्ष कटाईला मनाई असली तरी वडाळी परिक्षेत्र वगळता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाईला उधाण आले आहे. अवैध वृक्षकटाईला वनाधिकाºयांची मूक संमती असून, परवानगीसाठी मोठी अफरातफर झाल्याचे सूत्रांनी सांगितले.परतवाडा, अंजनगाव सूर्जी, लेहगाव, वरूड, मोर्शी, दर्यापूर, चांदूरबाजार आदी परिसरात आडजात वृक्षकटाई मोठ्या प्रमाणात सुरू असून, या भागातील आरागिरण्या लाकडांनी हाऊसफुल्ल आहेत. अकोट, अकोला आणि यवतमाळ मार्गावरून अमरावतीत आडजात लाकूड आणले जात आहे. आडजात वृक्षकटाईचे लाकूड वाहतुकीसाठी आरागिरणी संचालकांनी विशेष वाहनांना प्राधान्य दिले आहे. आडजात वृक्षकटाईला परवानगी नाही, असा निर्णय यापूर्वीच उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी घेतला आहे. मात्र, त्यांच्या अधिनस्थ वनाधिकाऱ्यांनी त्यांना अंधारात ठेऊन आडजात लाकूड वाहतूक राजरोसपणे सुरू केली आहे. हल्ली उन्हाळा प्रारंभ झाला असल्याने आरागिरणीत आडजात लाकूड साठवून ठेण्यासाठी वेग घेतला आहे. अमरावती शहरातही आरागिरण्यांमध्ये अवैध मार्गाने लाकूड आणले जात आहे.वृक्षांना आगी लावण्याचे प्रकार कधी थांबणार?आडजात झाडांना आग लावून ते पाडण्याच्या घटना लाकूड ते पाडण्याचा घटना नियमित सुरू आहे. चांदूरबाजार, परतवाडा, अकोट, दर्यापूर मार्गावर वृक्षांच्या बुध्यांशी आग लावून ते खिळखिळे केले जातात. रात्रीच्या वेळी या झाडांचे लाकूड आऱ्यांने कापून लंपास केले जाते. असा प्रकार निरंतर सुरू आहे. याकडे वनाधिकाºयांकडून ठोस कारवाई होत नसल्याची ओरड आहे.आडजात वृक्षांच्या कटाईला परवानगी नाही. मात्र, शेतकºयांचे निंब, बाभूळ कटाई परवानगीचे अर्ज आल्यास ते शासनाच्या मार्गदर्शनानुसार मंजूर केले जातात. अवैध लाकूड वाहतूक व आरागिरणी तपासणीसाठी धाडसत्र पथक गठित केले आहे.- एस. झेड. काझीवनक्षेत्र अधिकारी, वडाळी