शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

जिल्हा परिषदेत १३ व्या वित्त आयोगाचे नियोजन पाण्यात

By admin | Updated: June 7, 2015 00:27 IST

राज्य शासनाने जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद या तीनही स्थानिक स्वराज्य ...

चार कोटींचा निधी पडून : अधिकारी, पदाधिकारी झोपेत, वेळकाढू धोरणाचा परिणाम अमरावती : राज्य शासनाने जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हापरिषद या तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध टप्प्यांत १३ व्या वित्त आयोगाचा सुमारे ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र ठरलेल्या नियोजनाची प्रक्रिया ३१ मार्च आटोपल्यानंतरही पूर्ण न झाल्याने हा निधी अखर्चीत राहिला. त्यामुळे सध्यातरी या निधीचे भवितव्य अधांतरी आहे.या गंभीर प्रकाराकडे जिल्हा परिषदेचे पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणावरही चुप्पी साधल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह त्याच्या अधिनस्त येणाऱ्या पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी १३ व्या वित्त आयोगाच्या निधीकरिता सुमारे ६.५० कोटी रूपयांचे नियोजन केले होते. त्यानुसार वरील तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०१४/२०१५ या वर्षांसाठी जवळपास चार कोटीपेक्षा अधिक निधी राज्य शासनाने मंजूर करून तो थेट ग्रामपंचायतींना ७० टक्के, पंचायत समितींना २० टक्के आणि जिल्हा परिषदेला १० टक्क्यांप्रमाणे ९७ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिला. नियमानुसार हा निधी नियोजन करून ३१ मार्चपूर्वी खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र निधीच उशिरा प्राप्त झाल्याने १३ व्या वित्त आयोगातील रस्ते, इमारत, नाली बांधकाम, देखभाल दुरूस्ती, रंगरंगोटी व अन्य कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने १३ व्या वित्त आयोगाच्या निधीला ३० आॅगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. अशातच वरील तीनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकार क्षेत्रातील निधीचे नियोजन करण्याची जबाबदारी त्याची आहे. जिल्हा परिषद वित्त समितीने १३ व्या वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीचे नियोजन करून हा प्रस्ताव जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला आणि त्याला मंजुरीही मिळविली. मात्र सभेतील या ठरावाला अंतिम मंजुरी देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियोजनाची फाईल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. परंतु याला अद्याप अधिकाऱ्यांनकडून मान्यता मिळाली नाही. परिणामी अगोदरच मुदतवाढ दिलेल्या या निधीतील विकासाची कामे आॅगस्टअखेरपर्यंत कसे होतील, हा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी १३ वा वित्त आयोगाचा निधी कसा वेळेत खर्च होईल आणि विकासाची कामे कसे मार्गी लागतील याचा विचार करणे गरजेचे असताना अधिकाऱ्यांच्या या दप्तर दिरंगाईवर चुप्पी साधून पाठराखण केली जात आहे याबाबत चर्चा होत आहे. याबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुर्तास चर्चांना उत आला आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या १३ व्या वित्त आयोगाचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी सभागृहाने नियोजनास मंजुरी दिली आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांकडून होत असलेले दुर्लक्ष यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊ.- सतीश उईके, अध्यक्ष जिल्हा परिषद. तेराव्या वित्त आयोगाचा निधी वित्त विभागाला उशिरा प्राप्त झाला. याला राज्य शासनाने आॅगस्ट अखेरची मुदत दिली. मात्र या कालावधीत ही कामे नियोजित वेळेत होणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने मुदतवाढ द्यावी याकरिता पत्रव्यवहार केला आहे. - सतीश हाडोळे, वित्त सभापती जिल्हा परिषद.