शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक किलोमीटरच्या रस्त्यात शंभरांवर खड्डे

By admin | Updated: November 25, 2014 22:48 IST

अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

अमरावती : अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. केवळ एक-एक किलोमिटर अंतरावर शंभरांवर खड्डे पडलेले आहेत. लहान खड्ड्यांची संख्या तर अगिणत आहे. राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावरुन चालणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी वाहतूक करणारे नागरिक वैतागले आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर रस्ता दुरूस्तीचे काम झाले असले तरी काही ठिकाणच्या टप्प्यात अद्यापही रस्त्याचा प्रवास खडतर होऊन बसला आहे. यात पहिला टप्पा वलगाव बसस्थानकापासून ते आष्टी फाट्यापर्यंत, त्यानंतर पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर ते चांदूरबाजार स्टॉप या तीन टप्प्यातील राज्य महामार्गावर एक ते तीन किलोमीटर अंतरावर डांबरी रस्त्याचा प्रवास खडतर झाला आहे. गरोदर मातांना दुचाकी वाहनाने जाता-येताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असाह्य वेदनाचा सामना करावा लागतो. ऐवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिक व इतर सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरील जागोजागी खड्डे, उखडली गिट्टी, डांबर माथ्याचे ठिगळ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. यामुळे अपघाताच्याही घटना घडत आहे. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर काही महिन्यापूर्वी एसटी बसचा आणि किरकोळ अपघाताच्या घटना घडल्यानंतर बांधकाम विभाग अद्यापही जागा झाला नाही त्यामुळे अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील ज्या ठिकाणी मार्गात रस्त्याची चाळण झाली आहे आणि खड्डे पडले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होते आहे.