आॅनलाईन लोकमतअमरावती : पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला गाडगेनगर पोलिसांनी रविवारी रात्री पंचवटी चौकाजवळून अटक केली. शारूल लष्कर खलील मस्कर (२३, रा. ह.मु. साबनपुरा, मूळ रहिवासी कोलकाता, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीजवळून पिस्तूल व तीन काडतुसे जप्त केली असून, त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.शहरातील साबनपुरा परिसरात भाड्याने राहणारा शारुल लष्कर हा दीड महिन्यांपूर्वी अमरावतीत आला. राजकमल चौकातील एका कापड व्यावसायिकाकडे तो काम करीत होता. शहरातील एका व्यक्तीकडून पिस्तूल व काडतूस विकत घेतल्याचे पोलिसांना तो सांगत आहे. रविवारी तो मराठा शाळेजवळील चायनिज गाडीवर येत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती.वडिलांना त्रास देणाऱ्यांना ठार करण्यासाठी आल्याचे आरोपी सांगत आहे. मात्र, पिस्तूल कोठून आणले, याबाबत तो विविध उत्तरे देत आहे.- मनीष ठाकरेठाणेदार, गाडगेनगर
पिस्तूल, काडतूस बाळगणाऱ्या तरुणास अमरावतीत अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:39 IST
पिस्तूल व काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला गाडगेनगर पोलिसांनी रविवारी रात्री पंचवटी चौकाजवळून अटक केली.
पिस्तूल, काडतूस बाळगणाऱ्या तरुणास अमरावतीत अटक
ठळक मुद्देआरोपी कोलकात्याचा : दोन दिवसांची पोलीस कोठडी