शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचाव कृती समितीने रोखले पाईपलाईनचे खोदकाम

By admin | Updated: June 20, 2016 00:08 IST

चांदी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असूनसुद्धा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास आधीच ...

नांदगावात जलसंकट : नगरपंचायतीचा तुघलकी निर्णय मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरचांदी प्रकल्पात पाण्याचा मुबलक साठा असूनसुद्धा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यास आधीच असमर्थ ठरलेल्या नगरपंचायतच्या आणखी एका तुघलकी निर्णयाने नांदगावात जलसंकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नगरपंचायतीने वसतीगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी दिलेल्या एनओसीचा गैरफायदा घेत प्राधिकरणने सुरू केलेल्या पाइपलाईनच्या खोदकामाला पाणी बचाव समितीने वेळीच ब्रेक लावल्याने तुर्तास खोदकाम थांबले आहे. परंतु शहरवासियांवरील जलसंकटाची गडद छाया अद्यापही कायम आहे. लोकवर्गणीतून तसेच शासनाच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या कोट्यवधीच्या योजनेतून नांदगाववासीयांची तहान भागविण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाइपलाईनमध्ये झालेला भ्रष्टाचार व पाणीपुरवठा समितीच्या नियोजनशून्यतेमुळे शहरवासीयांची पाण्यासाठी तारांबळ होत आहे. मात्र, नगरपंचायतीने शहरवासीयांचा कुठलाही विचार न करता वसतिगृहाला पाणीपुरवठा करण्यासाठी जीवन प्राधिकरणला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्राधिकरणने याचा गैरफायदा घेत वसतिगृहापासून चार इंचाच्या पाईपलाइनचे खोदकाम सुरू करून शहरवासीयांच्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु येथील काही जागरूक नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी खोदकामाला विरोध करून पाईपलाईनचे काम बंद पाडल्याने तुर्तास शहरवासियांवरील जलसंकट टळले आहे. पाणीबचाव कृती समिती स्थापन करून राजेश पाठक, प्रकाश मारोटकर, शाम शिंदे, संजय पोपळे, सतीश पटेल, प्रमोद पिंजरकर, अरुण लहाबर, निकेत ब्राह्मणवाडे, शिवानी मेश्राम, मनोज बनारसे, सागर सोनोने यांचेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार सादर केली. जोपर्यंत शहरातील नागरिकांना दैनंदिन मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत इतरत्र पाणी न देण्याचा निर्धार पाणी बचाव कृती समितीने केला आहे.मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल गावकऱ्यांच्या बाजूने, सत्ताधारी मात्र गुलदस्त्यात पाणी बचाव कृती समितीच्या तक्रारीनुसार नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व प्राधिकरणकडे खोदकाम बंद करण्याबाबत अहवाल पाठवून नागरिकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु सत्ताधारी मात्र अद्यापही गुलदस्त्यात असून ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ अशी परिस्थिती सत्ताधाऱ्यांची झाली आहे.