शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
3
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
4
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
5
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
6
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
7
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
8
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
9
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
10
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
11
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
12
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
13
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
14
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
15
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
16
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
17
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
18
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

वैमानिक प्रशिक्षण करारनामा अडकला ?

By admin | Updated: November 5, 2016 00:17 IST

वैमानिक प्रशिक्षणासाठी गोंदिया येथील एका खासगी कंपनीने बेलोरा विमानतळाला पसंती दिली आहे.

फ्लार्इंग क्लबचे पत्र : राज्य शासनाकडून हालचाली मंदावल्याअमरावती : वैमानिक प्रशिक्षणासाठी गोंदिया येथील एका खासगी कंपनीने बेलोरा विमानतळाला पसंती दिली आहे. मात्र राज्य शासनाने अद्यापही करारनामा केला नसल्यामुळे विमानतळावरून प्रत्यक्षात वैमानिक प्रशिक्षणाला प्रारंभ झाला नाही. वैमानिक प्रशिक्षणाची त्वरित परवानगी मिळावी, यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अ‍ॅकेडमीने बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत वैमानिक प्रशिक्षणाची परवानगी द्यावी, असे पत्र यापूर्वी राज्य शासनाला देण्यात आले आहे. तथापि मध्यंतरी दिवाळीच्या सुट्या आल्यामुळे मंत्रालयातील कामकाजावरही याचा परिणाम झाला आहे. आता कुठे दोन दिवसांपासून प्रशासकीय कामकाजाला सुरुवात झाली आहे. तरीदेखील मंत्रालयातील खऱ्या अर्थाने ७ नोव्हेंबरपासूनच कामकाजाला गती येईल, असे संकेत आहेत. बेलोरा विमानतळाहून वैमानिक प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी आ. सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्यामुळे स्थानिकांना रोजगाराचे दालन खुले होतील, असा अंदाज आ. सुनील देशमुख यांनी वर्तविला आहे. बेलोरा विमानतळ येथून वैमानिक प्रशिक्षण सुरू करण्याचा नवा प्रस्ताव आल्यामुळे रखडलेली विकासकामे त्वरेने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सामान्य प्रशासन विभागाकडे यादी सादर केली आहे. गोंदिया विमानतळावर वैमानिक प्रशिक्षणासाठी जागा अपुरी पडत असल्याने सोईस्कर विमानतळावरून प्रशिक्षण देण्याचा निर्णय सीएई आॅक्सफोर्ड एव्हिएशन अ‍ॅकेडमीने घेतला आहे. बेलोरा विमानतळ हे वैमानिक प्रशिक्षणासाठी अतिशय सोयीचे असल्यामुळे राज्य शासनासोबत करारनामा होताच अमरावतीच्या आकाशात प्रशिक्षणाची विमाने उडाण घेतील, यात दुमत नाही. १८ महिने कालावधीचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी वैमानिकांना मिळणार आहे. वैमानिक प्रशिक्षणाची परवानगी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही एव्हिएशन अ‍ॅकेडमीला लालफितशाही कारभाराचा सामना करावा लागत आहे. गोंदिया येथील फ्लार्इंग क्लबच्या चमुने बेलोरा विमानतळाची गत महिन्यात चाचपणी करून वैमानिक प्रशिक्षणासाठी होकार दर्शविला होता. राज्य शासनाकडे त्याअनुषंगाने प्रस्तावही सादर केला. मात्र २० ते २५ दिवसांचा कालावधी होऊनही सामान्य प्रशासन विभागाने वैमानिक प्रशिक्षणासाठी करारनाम्याची प्रक्रिया राबविली नसल्याची माहिती आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने पाठविलेला प्रस्ताव लालफितशाहीत अडकल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)वळण रस्ता निर्मितीच्या निविदा निघाल्याबेलोरा विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने युद्धस्तरावर प्रयत्न चालविले आहे. विमानतळाच्या विस्तारिकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. वळण मार्ग निर्मितीच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. लवकरच वळण रस्ता निर्मितीच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम. पी. पाठक यांनी दिली.