शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या २७ शाळांचे बदलणार चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:17 IST

अमरावती : सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यात २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी शासनाने निर्णय ...

अमरावती : सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यात २१ व्या शतकातील कौशल्ये विकसित करण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार जिल्ह्यातील २७ जिल्हा परिषदांच्या शाळांचा कायापालट होणार आहे.

पाठ्यपुस्तकाच्या मऱ्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात. शिक्षणाच्या प्रती समाज सक्रिय व्हावा, या उद्देशाने सोबतच शाळांप्रती पालकांचा विश्वास वाढावा याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. राज्यासह जिल्ह्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती केली जाणार आहे. शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेल्या ४८८ शाळांपैकी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २७ शाळांना विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

बॉक्स

या निकषानुसार शाळा निवड

मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड केली आहे. यामध्ये वाढता लोक सहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान १०० रे १५० पटसंख्या, शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) उपलब्धी, आकर्षक शाळा इमारत, विद्याथीर्संख्येनुसार वर्ग खोल्या, मुलां-मुलींकरिता आणि सीडब्युएसएन साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह या सारख्या निकषांचा यात समावेश आहे.

बॉक्स

असा होईल विकास

आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या दृष्टीने सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी, वर्गखोल्या, संगणकीकरण, शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर निधीचा विनियोग करण्यात येणार आहे. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाणार आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील या आहेत शाळा

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नांदुरा बु,नेरपिंगळाई, येवदा, हरम, मार्डी, पांढरी खानापूर, मनपा शाळा क्र. २, खिडकीकलम, तोंडगाव, बेलोरा चांदूर बाजार, विसोळी, घाटलाडकी, देऊरवाडा, राजनापूर्णा, शिजरगाव बंड, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव कसबा मराठी व उर्दू शाळा, शिवनी रसुलापूर, गांगरखेडा, शासकीय विद्यानिकेत मनपा, बेनोडा, टाकरखेडा संभू, जळका जगताप आणि अंजनसिंगी अशा २७ शाळांचा कायापालट होणार आहे.