शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी; कॉलेज युवतीवर बलात्कार, युवकावर गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: October 8, 2023 14:12 IST

नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा : उदयानात बोलावून शिविगाळ

अमरावती - प्रपोझला होकार भरताच अल्पवयीन प्रेयसीवर शारीरिक बळजबरी करून तिचे त्या स्थितीतील फोटो काढण्यात आले. पुढे ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६ मार्च २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंतच्या कालावधीदरम्यान ती अत्याचाराची मालिका घडली.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अल्पवयीन पिडिताच्या तक्रारीवरून देवानंद बोडके (रा. यवतमाळ) याच्याविरूध्द बलात्कार, धमकी, शिविगाळ व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. येथील एका कनिष्ट महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला देवानंद बोडके याने प्रपोझ केले. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ते दोघेही सोशल मिडियावर व्यक्त होऊ लागले. अशातच ६ मार्च २०२२ रोजी रात्री १२ ते १ च्या सुमारास त्याने तिला भेटायला बोलावले. प्रेमाखातर ती देखील गेली. त्यावेळी त्याने तिच्यावर शारीरिक जबरदस्ती केली. तथा तिचे घाणेरडे फोटो देखील काढले. त्यानंतर तुझ्याशी लग्न करतो, अशी बतावणी करून ६ एप्रिल २०२२ रोजी पुन्हा तिच्यावर जबरदस्ती केली.

दरम्यान पिडिताचे १२ वी पेपर संपल्यानंतर तिला आरोपीने गाडगेनगर येथे त्याच्या मित्राच्या खोलीवर बोलावले. तेथे तुझे अश्लिल फोटो माझ्याकडे आहेत, मी अपलोड करेन, अशी भीती दाखवून जानेवारी २०२३ पर्यंत तिचे सर्वस्व लुटले.

मित्रासोबत व्हॉट्सॲपवर का बोललीस?मित्रासोबत व्हॉट्सॲपवर का बोललीस? असा जाब विचारत त्याने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी तिला एका उद्यानात भेटायला बोलावले. सकाळी ११ च्या सुमारास उद्यानात पोहोचल्यानंतर त्याने तिला शिविगाळ केली. तथा तिच्या गालावर थापडा मारल्या. तो सततचा त्रास सहनशक्तीपलिकडे गेल्याने अखेर तिने ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नांदगाव पोलीस ठाणे गाठले. तथा पोलीस दप्तरी तक्रार नोंदविली.