शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्ताच्या विव्हळण्याचे फोटोसेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:27 IST

मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.

ठळक मुद्देमाणुसकी संपली? : एसटीच्या धडकेत वृद्धाचा पाय निकामी

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात माणुसकी पूर्णत: संपली का, असे विचारण्याची वेळ गुरुवारच्या घटनेने पुन्हा एकदा आली. ६२ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या धडकेत पाय पूर्णत: चिरडला गेला. त्यास मदत न करता बसमधील अनेक प्रवासी आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनी त्या वृद्धाची, त्याच्या अपघातग्रस्त पायाचे मोबाइलद्वारे छायाचित्र काढले.गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास परतवाडा-धारणी मार्गावरील बिहाली नर्सरीजवळ चांदूरबाजार-भांडुम एसटीची दुचाकीला धडक बसली. यात ठुनू धिकार (६२, रा. जारिदा) यांच्या पायावरून चाक गेल्याने त्यांना रस्त्यावरून उठणे शक्य होत नव्हते. अपघात होताच एसटीमधील प्रवासी निघून गेले. चालक-वाहक रुग्णवाहिका व अन्य बसची व्यवस्था करतो म्हणून घटनास्थळावरून चालते झाले. अन्य कुणीही १५ किमीवरील परतवाडा शहरात आणण्याची तसदी घेतली नाही.दोन तास रस्त्यावर पडूनगुरुवारी सायंकाळी ४ वाजता अपघात झाल्यानंतर त्याच रस्त्याने परतवाडा शहरातील विजय मिश्रा नामक सामाजिक कार्यकर्ता घटांग येथे जात होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास येताच रस्त्याने जाणाºया वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीच थांबले नाही. अशात एसटी बसचे चालक-वाहक रुग्णवाहिका पाठवतो म्हणून चालते झाले. जखमीला मदत मिळाली असावी, असे समजून विजय मिश्रा तेथून निघून गेले. मात्र, दोन तासानंतर परत जात असताना त्यांना ठुनू धिकार हे तेथेच जखमी अवस्थेत पडून दिसले.एक पाय निकामीठुनू धिकार यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात चिरडल्याने त्यांचा एक पाय कापण्यात आला असल्याची माहिती सुदामा मासागोले या त्यांच्या जावयाने दिली. शासनातर्फे अपघाती व्यक्तीस मदत व रुग्णालयात पोहचविल्यास पोलिसांतर्फे कुठल्याच प्रकारची कारवाई होणार नसल्याच्या जाहिराती केल्या जातात. तरीसुद्धा शासकीय रुग्णवाहिका वरिष्ठांच्या दबावाखाली थांबत नाहीत. सामान्य नागरिक अपघात पाहून काढता पाय घेतात.