प्रजासत्ताक दिन विशेष : भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी अमरावती : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘लोकमत’ व पवार डिजिटल फोटो स्टुडिओच्यावतीने वाचकांच्या छायाचित्रांसह आकर्षक सामाजिक संदेश समाविष्ट असलेले एक विशेष पान २६ जानेवारी रोजी प्रकाशित केले जाणार आहे. या ‘प्रजासत्ताक दिन विशेष’ उपक्रमात १ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांसह १५ ते ६० वर्षे वयोगटातील वाचकांना त्यांची छायाचित्रे अल्पदरात प्रकाशित करून घेण्याची संधी 'लोकमत'ने उपलब्ध केली आहे. या उपक्रमांतर्गत आयोेजित स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देऊन पुरस्कृतही केले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन देशभरात केले जाणार आहेत. 'लोकमतने'देखील या उपक्रमात वाचकांना सहभागी करून घेण्यासाठी ही अभिनव संकल्पना अमलात आणली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या छायाचित्रांना पुरस्कृत केले जाईल. पहिला क्रमांक पटकावणाऱ्या छायाचित्राला मोठी सायकल, दुसऱ्या क्रमांकाला लहान सायकल, तर तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या छायाचित्रासाठी २.५ बाय ४ फूट आकाराच्या छायाचित्रासह फोटो फ्रेम प्रदान करण्यात येणार आहे. इतर आकर्षक बक्षिसांमध्ये विजेत्या स्पर्धकांच्या फोटोसह पाच कॉफी मग, फोटो प्रिंटसह पाच टी-शर्ट, पाच फोटो कॅलेंडर व फोटोसह पाच रिव्हॉल्व्हिंग क्युब प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठविले जाणारे छायाचित्र १५ बाय २० सेंमी. आकारात पाठवावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘लोकमत’, पवार स्टुडियोद्वारे छायाचित्र स्पर्धा
By admin | Updated: January 23, 2017 00:09 IST