शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावरची स्वच्छतागृहे खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 21:53 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये व मुत्रालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेचा निर्णय : सार्वजनिक वापर अनुज्ञेय, लॉन, मंगल कार्यालयांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गंत महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये व मुत्रालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा आदेश महापालिकेने काढला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत आयुक्त हेमंत पवार यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या या आदेशाने शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहातील शौचालयांचा सार्वजनिक वापर करता येईल.ग्राहक नसलेल्या नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेली शौचालये-मुत्रालये सार्वजनिक म्हणून पालिकेने घोषित केले. त्यामुळे पेट्रोलपंपांवर ग्राहक नसलेल्या व्यक्तींना शौचालये वापरता येईल. शहरात २२ पेट्रोलपंप आहेत. ती नागरिकांसाठी खुली झाल्याने रस्त्यावर होणारी अस्वच्छता दूर होणार आहे. या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून स्वागत केले जात आहे. पेट्रोलपंपावरची स्वच्छतागृहे व मुत्रालयांची क्षमता अधिक नसते, कर्मचारी व ग्राहकांपुरतीच त्यांची क्षमता असून सिवेज टँकही त्याच क्षमतेचा असतो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विचार न करता हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया पेट्रोलपंपचालकांमध्ये उमटली आहे.‘स्वच्छता हीच सेवा’ हे ब्रीद समोर ठेवून केंद्र व राज्य सरकारने स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात केली. मागील वर्षी राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा क्रमांक २८१ वा होता. ती नामुष्की टाळून पहिल्या १०० क्रमांकावर येण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. शहर १०० टक्के हगणदारीमुक्त करणे, यावर स्वच्छ सर्वेक्षणाची मदार असून त्यासाठी ४००० गुणांपैकी १२०० गुण आहेत. त्यापार्श्वभूमिवर सामुदायिक, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालय उभारणीसह उघड्यावर प्रात:विधी ज्या ठिकाणी उरकला जातो ती ठिकाणे निष्कासित करण्यात येत आहेत.असे आहेत निर्देशगृहनिर्माण व नागरीकार्य मंत्रालय दिल्ली यांच्या निर्देशान्वये महाराष्टÑ महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक अधिनियम १९६५ च्या तरतुदी अन्वये, अमरावती महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहे तसेच सर्व कंपन्यांचे पेट्रोलपंपांवरील शौचालये/मुत्रालय हे यापुढे सार्वजनिक शौचालय/मुत्रालय म्हणून वापरले जातील व ते सार्वजनिक जनतेकरिता अनुज्ञेय राहील.केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महापालिका हद्दीतील पेट्रोलपंप, सर्व हॉटेल्स, मंगल कार्यालये, लॉन, सभागृहातील शौचालये, मुत्रालये यापुढे सार्वजनिक म्हणून वापरल्या जातील.- हेमंत पवार, आयुक्त, मनपा