शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १२ स्वच्छता कंत्राटदारांची याचिका खारिज, उच्च न्यायालयाचा निर्णय

By प्रदीप भाकरे | Updated: April 24, 2023 17:59 IST

लवादाकडे जाण्याची सुचना

अमरावती : महानगरपालिकेविरोधात उच्च न्यायालयात गेलेल्या १२ स्वच्छता कंत्राटदारांची याचिका खारिज करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने सोमवारी हा निर्णय दिला. त्या न्यायनिर्णयामुळे एकीकडे त्या १२ कंत्राटदारांना दणका बसला असला तरी, महापालिकेला दिलासा मिळाला आहे. आपण थेट उच्च न्यायालयाकडे न येता आधी लवादाकडे जायला हवे होते, असे निरिक्षण नोंदवून न्यायालयाने त्यांची याचिका ‘डिसमिस’ केली.             महानगरपालिका प्रशासनाने प्रभागनिहायऐवजी आरंभलेली झोननिहाय कंत्राट प्रक्रिया रद्द करून विद्यमान कंत्राटदारांना मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी १२ स्वच्छता कंत्राटदारांनी नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. त्यावर दोन्ही बाजुंनी युक्तीवाद करण्यात आला. त्यावर न्यायालयाने २४ एप्रिल रोजी अंतिम निर्णय दिला. आम्हाला करारनाम्याप्रमाणे एक वर्षांची मुदतवाढ देणे न्यायसंगत आहे, आम्ही कर्ज काढून साधनसामग्री घेतली. अशी बाजू कंत्राटदारांच्या वतीने मांडण्यात आली. तर करारनाम्याप्रमाणे मुदतवाढ देणे बंधनकारक नसून, त्यापैकी अनेक कंत्राटदारांचे काम असमाधानकारक असल्याचा से महापालिकेने दाखल केला होता. दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने आपण आधी करारनाम्याप्रमाणे लवादात का गेला नाहीत, थेट न्यायालयात का आलात, असा सवाल केला. कंत्राटदार आणि महापालिकेतील वाद मिटविण्यासाठी उच्च न्यायालय सक्षम प्राधिकरण नसल्याचे निरिक्षण नोंदविले गेले.

महापालिकेने आरंभलेल्या झोननिहाय स्वच्छता कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेविरोधात न्यायालयात गेलेल्या १२ कंत्राटदारांची याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी खारिज केली. त्यांना लवादाकडे जाण्याचे आदेश दिले.

- ॲड. श्रीकांत चव्हान, विधी अधिकारी

टेक्निकल बिडचा मार्ग मोकळा

३ मार्च रोजी सुरू झालेल्या झोननिहाय निविदा प्रक्रियेदरम्यान १७ एप्रिल रोजी टेक्निकल बिड उघडले जाणार होते. मात्र, स्वच्छता कंत्राटदारांच्या याचिकेमुळे त्याला ब्रेक देण्यात आला होता. त्यावर लिफाफा उघडायचा की कसे, हे अवलंबून होते. मात्र आता १२ कंत्राटदारांची याचिकाच खारिज झाल्यामुळे प्रशासन आनंदी झाले आहे. सोमवारच्या निर्णयाची जजमेंट कॉपी आल्यानंतर लगेचच झोननिहायचे टेक्निकल बिड उघडेल. एकंदरितच आता झोननिहायला गती येणार आहे.

टॅग्स :Courtन्यायालयAmravatiअमरावतीHigh Courtउच्च न्यायालय