कर्मचाऱ्यांची समयसूचकता : अपघाताची शक्यता टळली
टाकरखेडा संभू : आष्टीनजीक रस्त्याच्या कडेला अचानक एका मोठ्या झाडाने पेट घेतला. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत अपघाताची शक्यता टाळली.
अमरावती-परतवाडा महामार्गावर आष्टीनजीक शनिवारी रात्री ९ च्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या एका मोठ्या झाडाने अचानक पेट घेतला. पाहता पाहता संपूर्ण झाड आगीच्या कवेत गेले. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने ही माहिती बांधकाम विभागाच्या आष्टी येथील कर्मचाऱ्याला दिली, शिवाय अग्निशमन दलालादेखील कळविले. पेटलेले झाड कोसळण्याची भीतीदेखील होती. मात्र, कर्मचारी बबनराव लोखंडे व ज्ञानदेव जवंजाळ यांनी सायकलवर पाणी आणून या झाडावर टाकणे सुरू केले. काही वेळातच त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. तशी माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यामुळे मोठी हानी टळली.
----------