शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पेसा निधीत भ्रष्टाचार; ग्रामसेवकांना अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 22:23 IST

मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे.

ठळक मुद्देसावलीखेडा ग्रामपंचायत : सीईओंचे मौन

श्यामकांत पाण्डेय।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : मेळघाटातील आदिवासी जनतेचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शासनाने पेसा अंतर्गत कोट्यवधीचा निधी ग्रामपंचायत स्तरावर थेट हस्तांतरित केला. संबंधित ग्रामसेवकांनी नियमांचे पालन न करता विविध प्रकारचे साहित्य मनमानी पद्धतीने खरेदी करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या गंभीर प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडली. पंचायत समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल यांचे या प्रकरणात नवनीवन खुलासे होत आहेत. तरीदेखील धडक कारवाईचा अद्याप पत्ताच नाही. प्रशासन ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहे का, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.सभापती रोहित पटेल यांनी सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत पेसा निधीतून अंगणवाडी साहित्य खरेदीचे प्रकरण सप्रमाण उचलून धरले आहे. जवळपास नऊ प्रकारचे साहित्य खरेदी करण्यात आले. एका अंगणवाडी केंद्रात सरासरी दीड लाख रुपयांचे तफावतीचे देयक ग्रामसेवकांनी काढले. सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत चार अंगणवाडी केंद्रांमध्ये एकाच प्रकारचे साहित्य खरेदी करून सहा लाख रुपयांची अफरातफर करण्यात आल्याची तक्रार रोहित पटेल यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्याकडे केली होती.दोन आठवडे लोटूनही या तक्रारीच्या अनुषंगाने अद्याप या गंभीर प्रकरणाकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सदर ग्रामसेवकाला प्रशासन पाठीशी घालत तर नाही ना, अशी चर्चा मेळघाटात नागरिकांमध्ये होत आहे. तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसल्यामुळे पंचायत समिती सभापती रोहित पटेल यांनी याप्रकरणी पुन्हा नव्याने तक्रार करण्याची तयारी चालविली आहे.कोणतेही जिल्ह्यातील अधिकारी रुजू होताच मेळघाटातील आदिवासींचे समस्या प्रकषार्ने निकाली काढण्याचे आश्वासन देऊन प्रसिद्धी माध्यमांना आपलेसे करून घेतात. परंतु, कालांतराने असे प्रकरण समोर आले असताना त्यांच्याकडून कारवाईमध्ये सातत्य जाणवत नाही. यामुळे अशा अधिकाºयांकडून मेळघाटातील विकास साध्य होण्याची स्वप्न भंगले आहे.इतर क्षेत्रातील भ्रष्टाचाराची होणार का चौकशी?सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सहा लाख रुपयांच्या निधीचा केवळ पेसा अंतर्गत घोळ झालेला असताना, कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाने पेसाव्यतिरिक्त अन्य निधीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याची चर्चा आता सुरू झाली. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.