शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्थायी’त वादाची ठिणगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:24 IST

मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या नेतृत्वातील पहिल्याच स्टँडिंगमध्ये दोन नवनियुक्त सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ही तू-तू, मै-मै आगामी सभेतही कायम राहणार काय, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून,......

ठळक मुद्देमहापालिका : दोन सदस्यांमध्ये तू-तू, मै-मै

ऑनलाईन लोकमतअमरावती : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या नेतृत्वातील पहिल्याच स्टँडिंगमध्ये दोन नवनियुक्त सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ही तू-तू, मै-मै आगामी सभेतही कायम राहणार काय, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून, स्थायीत खेळीमेळीचे वातावरण असावे, विरोध नोंदवून घ्यावा, मात्र शाब्दिक चकमक टाळायला हवी, अशी सांघिक प्रतिक्रिया उमटली आहे.स्थायी समिती सभापती म्हणून अविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच कलोती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी १ वाजता स्थायीची सभा झाली. सभेच्या सुरूवातीलाच दैनंदिन स्वच्छतेच्या एकल कंत्राटाचा मुद्दा चर्चेस घ्यायचा की नाही, यावरून मतमतांतरे झाली.याबाबत प्रशासनाकडून कुठलाही प्रस्ताव न आल्याने चर्चा करणे योग्य होणार नाही, असा सूर स्थायीत नव्याने प्रवेशलेल्या भाजप सदस्याने लावला. तर ‘चर्चा झालीच पाहिजे’ अशी भूमिका अन्य पक्षातील नवनियुक्त सदस्याने घेतली.दोन्ही नवख्या स्थायी सदस्यांमधील शाब्दिक चकमक भाजप सदस्यानेच वडीलकीची भूमिका घेत थांबविली. तथापि, दोन भिन्न पक्षांतून आलेल्या दोन सदस्यांमध्ये झालेली चकमक ‘पुढील युद्धा’ची नांदी ठरली. कलोतींना आता सभापती म्हणून स्थायी सभागृहाचा ‘विवेक’ जपावा लागणार आहे. मात्र, गुरुवारच्या बैठकीत झालेल्या हमरीतुमरीवरून स्थायीच्या पुढील बैठकीतही असेच रणकंदन होईल का, असा भीतियुक्त स्वर अधिकारी, विभाग प्रमुखांमध्ये उमटला आहे. दरम्यान, स्थायी समिती बैठक बंद दरवाजाआड घेतली जाते. स्थायीमधील कामकाज बाहेर येऊ नये, अशी त्यामागील भूमिका असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अन्य महापालिकांमधील स्थायीचे कामकाज आमसभेप्रमाणे चालत असताना, महापालिकेत कुठली प्रथा चालविली जात आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.