शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांच्या गर्दीत स्थायीचे चेहरे ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:54 IST

महापालिकेची तिजोरी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी डझनावर इच्छुक समोर आल्याने भाजप कोअर कमिटीची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्देबैठकांना जोर : शनिवारच्या आमसभेत नावांची घोषणा

आॅनलाईन लोकमतअमरावती : महापालिकेची तिजोरी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समितीत जाण्यासाठी डझनावर इच्छुक समोर आल्याने भाजप कोअर कमिटीची पंचाईत झाली आहे. ‘अभी नही तो कभी नही’च्या धर्तीवर बहुतांश नगरसेवकांनी ताणून धरल्याने बैठकांचा रतीब घातला जात आहे. काँग्रेस व एमआयएममध्ये भाजपसारखी स्पर्धा नाही. भाजपमधून स्थायी समितीत जाण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग असल्याने नव्या चेहऱ्यावर आमसभेच्या पूर्वसंध्येलाच अंतिम शिक्ककमोर्तब केले जाणार आहे.नजर सभापतिपदावरचस्थायी समितीच्या १ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीदरम्यान काढण्यात आलेले ईश्वरचिठ्ठीने आठ सदस्य बाद झालेत. यात भाजप-काँग्रेसचे प्रत्येकी तीन आणि एमआयएमच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. १६ सदस्यीय स्थायीची रचना पूर्ण करण्यासाठी आता नव्याने आठ सदस्य पाठविले जातील व त्यातून स्थायी समिती सभापतीची निवड होईल. १६ सदस्यीय स्थायीत भाजपचे नऊ सदस्य असल्याने सभापती भाजपचाच होईल, ही जरी काळ्या दगडावरची रेघ असली तरी सभापतिपदासाठी अनेक जण इच्छुक असल्याने पेचप्रसंग उभा ठाकला आहे.काँग्रेस व भाजपकडून प्रत्येकी तीन व एमआयएमकडून दोन सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी पक्षस्तरावर बैठकांचा रतीब घातला जात आहे. भाजपमध्ये ती कुत्तरओढ अधिक तीव्र आहे. १७ फेब्रुवारीला महापालिकेची आमसभा होत असून, त्यात ही नावे पक्षनेत्याकडून मागविली जातील. त्यानंतर पीठासीन सभापती त्या नावांची अधिकृत घोषणा करतील. त्यामुळे भाजपसह काँग्रेस व एमआयएम सदस्यांची नावे १६ फेब्रुवारीला रात्री निश्चित करण्यात येतील.भाजपमध्ये तीव्र स्पर्धा४९ सदस्यीय भाजपच्या गोटातून स्थायीत जाण्याची धडपड अधिक तीव्र झाली आहे. महापौर, उपमहापौर, झोन सभापती व सभागृहनेता वगळता अनेकांनी त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. तुषार भारतीय आणि विवेक कलोती हेसुद्धा नव्याने थेट सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. भाजपमधून तीन डझनांहून अधिक सदस्य स्थायीत जाण्यासाठी इच्छुक असताना भारतीय व कलोतींना पुन्हा पाठवायचे की कसे, यावर जोरदार मंथन सुरू आहे. कोअर कमिटीत निर्णय न झाल्यास हा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पाठविण्याच्या मानसिकतेपर्यंत भाजप आली आहे.काँग्रेसकडून अनुभवाला प्राधान्य१० सदस्यीय एमआयएममधून स्थायी समितीमध्ये दोन सदस्य नव्याने पाठविण्यात येतील. सभागृहात लक्ष वेधून घेणारे या पक्षाचे गटनेता अ. नाजीम हे स्वत:च स्थायीत जाण्याची अधिक शक्यता आहे. काँग्रेसकडून अनुभवी सदस्यांना संधी दिली जाईल, असे संकेत मिळत आहेत. १५ सदस्यीय काँग्रेसचे तीनही सदस्य स्थायीतून बाहेर पडले. नव्याने पाठविण्यात येणाऱ्या चेहऱ्यांमध्ये अनुभवी सदस्य असू शकतात.