शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात काँग्रेस, अपक्षांचा टक्का घसरणार

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमरावती : जिल्ह्यात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, अपक्ष उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली होती. मात्र; यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वेगळे निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी काँग्रेस, अपक्षांची संख्या रोडावेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आले होते. यात तिवसा येथून यशोमती ठाकूर, अमरावतीतून रावसाहेब शेखावत, मेळघाटमधून केवलराम काळे तर धामणगाव रेल्वे मतदारसंघातून वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता. अपक्ष म्हणून बडनेऱ्यातून रवी राणा, मोर्शीतून अनिल बोंडे तर अचलपुरातून बच्चू कडू विजयी झाले होते. शिवसेनेला दर्यापूर मतदारसंघात विजय मिळविता आला. परंतु या निवडणुकीत युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर भाजप, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अख्खा महाराष्ट्र भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंजून काढला. त्यामुळे शहरी भागात मोदीलाटेचा परिणाम जाणवला. भाजपचे शेवटपर्यंत लढतीत नसलेले उमेदवार ऐनवेळी स्पर्धेत आले. हिंदुत्व विचारसरणीच्या मतदारांनी भाजप उमेदवारांच्या बाजुने कौल दिल्याचे चित्र मतदानानंतर स्पष्ट होऊ लागले आहे. गुप्तचर यंत्रणेने सुद्धा हाच अंदाज वर्तविला आहे. चार ते पाच जागा भाजपला मिळतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या; आता भाजपला चार जागा मिळण्याचे संकेत आहेत. गत विधानसभा निवडणुकीत तीन जागा अपक्षांना मिळाल्या होत्या. मात्र, आता अपक्षाला एकच जागा मिळविता येईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. थोड्या फार मतांचे बदल झाल्यास शिवसेनेला दोन ते तीन जागांवर विजय मिळवता येईल, अशी मतदानानंतरची परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. गत निवडणुकीत एकही जागा भाजपला मिळवता आली नव्हती. मात्र, यंदा चार ते पाच जागांवर विजयाची अपेक्षा आहे. शिवसेनेचे गड असलेल्या बडनेरा, दर्यापूर व तिवसा मतदारसंघात भाजपने दमदार उमेदवार मैदानात आणून सेनेला घाम सुटल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. युती, आघाडीची ताटातूट झाल्यानंतर बसपने खाते उघडण्याच्या उद्देशाने धामणगाव, अमरावती, अचलपूर मतदार संघात अनुक्रमे अभिजीत ढेपे, मिर्झा नईम बेग, हाजी रफीक सेठ यांना उमेदवारी देऊन जोरदार ‘फिल्डींग’ लावली. मात्र बसपचा हत्ती फार धावला नाही, असे मतदानानंतर दिसून आले. तरीही बहुजन समाज पक्ष निकालामध्ये महत्वाची भूमिका बजावण्याची चिन्हे आहेत. एकूणच राजकीय विश्लेषकांच्या अंदाजांवरून सध्या तरी जय-पराजयाची गणिते बांधली जात आहेत.