शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जनआक्रोश मोर्चासाठी जिल्हा काँग्रेसने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:05 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपूर्वतयारी : जिल्ह्यातून हजारोवर कार्यकर्ते होणार सहभागी

आॅनलाईन लोकमतअमरावती : केंद्र व राज्यातील भाजप सरकारने तीन वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना न्याय देण्याऐवजी अन्यायकारक निर्णय घेतले. त्यामुळे भाजप सरकार विरोधात जनतेत तीव्र जनआक्रोश निर्माण झाला आहे.भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्यावतीने दीक्षाभूमीपासून विधिमंडळापर्यंत जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ३ डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा व तालुका पदाधिकाºयांची बैठक बोलवली होती. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला आमदार वीरेंद्र जगताप, माजी आमदार केवलराम काळे, झेडपीचे सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी बबलू देशमुख यांनी भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेत शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांवर अन्याकारक धोरण राबविले. परिणामी जनतेत भाजप सरकारविरुद्ध रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्यावतीने हिवाळी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्चाच्या नियोजन व सहभागाबाबत पदाधिकाºयांना महत्त्वाच्या सूचना पदाधिकाºयांनी कार्यकर्त्यासह सहभागी होण्याचे आवाहन बबलू देशमुख यांनी केले. सभेला आ. वीरेंद्र जगताप यांनी मार्गदर्शन केले. मोर्चात अ.भा. काँग्रसेचे नेते गुलाबनबी आझाद व अनेक नेते सहभागी होणार असून कार्यकर्त्यांनी हातात काँग्रेस झेंडे घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन केले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन जयंत देशमुख यांनी केले. सभेला भैय्यासाहेब मेटकर, प्रकाश काळबांडे, मनोज देशमुख, राजेंद गोरले, बाळासाहेब हिंगणीकर, महेद्रसिंग गैहलवार, सुभाष पाथरे आदी उपस्थित होते.काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्यांमध्ये भाजप सरकारविरोधात रोष वाढला आहे. फसवी कर्जमाफी व अन्य प्रश्नामुळे शेतकरी संकटात आहे. यासह इतर प्रश्नांसाठी अधिवेशनावर जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे.- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी