शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींची खडाजंगी

By admin | Updated: July 21, 2014 23:37 IST

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना

पालकमंत्र्यांची शिष्टाई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तापली सभाअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ २२ टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. मात्र यातही दुबार पेरणीचे संकट उभे असताना दुष्काळाची स्थिती गंभीर होत आहे. या मुद्यावर शेतकऱ्यांसाठी प्रशासकीय यंत्रणा काहीच करीत नसल्याने संतप्त सत्ताधारी काँग्रेस व अपक्ष आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची पालकमंत्र्याच्या उपस्थितीत पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना अद्यापही गारपिटीचे अनुदान पूर्णपणे मिळाले नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा मुद्दा या सभेत लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य अभिजित ढेपे यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडला असता, धामणगाव रेल्वे मतदारसंघात ९५ टक्के गारपीटग्रस्तांना मदत वाटप झाल्याचे धामणगावचे लोकप्रतिनिधींनी सांगताच, या मुद्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी गटात चांगलीच जुंपली. या मुद्यावर वादळ उठले असताना आमचे-तुचे प्रश्न उपस्थित झाल्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत यावर आक्षेप नोंदविला. अखेर पालकमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यामुळे हा तणाव निवळला. वातावरण शांत होत नाही तोच पीक विम्याच्या मुद्यावर तसेच शेतकऱ्यांना कर्जवाटपाबाबत बँकांकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा मुद्या उपस्थितीत झाला. यावर लोकप्रतिनिधींसह देशमुख यांनी विरोधकांच्या या प्रश्नाला बगल देण्याच्या प्रयत्न केला. मात्र विरोधकांनी या मुद्यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेत ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी कृषीमंत्र्यांकडे उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. याशिवाय जिल्ह्यातील संत्रा मृग बहर फुटला नाही, तर आंबिया गळाला. त्यामुळे संत्रा उत्पादकांना फटका बसल्यामुळे संत्रा उत्पादकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या आक्रमकतेमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत्रा बागांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाच्या यंत्रणेला दिले. हा अहवाल प्राप्त होताच मदतीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात पालकमंत्र्यांनी दिले. सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेत ही सभा चांगलीच गाजवली. सभेला आ. वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, अनिल बोंडे, अभिजित अडसूळ, यशोमती ठाकूर, केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, बबलू देशमुख, जि.प. अध्यक्ष सुरेखा ठाकरे, महापौर वंदना कंगाले, विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.