शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

महाराष्ट्र सरकार सुस्त-जनता कोरोनाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 09:09 IST

कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. 

ठळक मुद्देनिष्क्रिय महाराष्ट्र सरकार बरखास्त करा व महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली.  महाराष्ट्र व विदर्भाला तसेच अमरावती जिल्ह्याला पुन्हा भरीव मदत करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली.कोरोनाच्या या महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार यांना मानाचा मुजरा करून, या लढ्यात ज्या कोरोना योद्ध्यांनी आपले प्राण गमावले त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून राणा यांनी स्वत:च्या अनुभवावरून आपबीती लोकसभेत मांडली.रविवारी लोकसभेत नियम 193 अंतर्गत देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत सहभागी होऊन त्यांनी अत्यंत भावुक पण तेवढेच वस्तुनिष्ठ व मार्मिक विवेचन स्वानुभवावरून केले. आपण, आपले पती आमदार रवी राणा व संपूर्ण कुटुंबातील 18 सदस्य या अग्निदिव्यातून गेलो असून कोरिनाग्रस्तांच्या सर्व समस्या अनुभवल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती भयावह आहे. बेड-व्हेंटिलेटर-आॅक्सिजन-मास्क-इंजेक्शन आदींचा प्रचंड तुटवडा आहे. रुग्णांना बेड नाही हॉस्पिटलची संख्या कमी आहे. उपचाराअभावी अनेक रुग्ण तडफडून प्राण सोडत आहेत. खाजगी दवाखान्यांची अधिग्रहण मर्यादा 10% वरून 50%करावी व नागरिकांची सोय करावी अशी मागणी त्यांनी पुढे केली.सध्या खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या नावावर प्रचंड लूट सुरू असून एकेका रुग्णाकडून 2 ते 12 लाख रुपये लुटले जात आहेत. केंद्र सरकारने आकस्मिक कायदा लागू करून या रुग्णालयांच्या व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी व गोरगरीब रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

सध्या विदर्भात ऑक्सिजन चा प्रचंड तुटवडा असून केंद्रीय आरोग्य विभागाने आयनॉक्स नावाच्या कंपनीला पश्चिम विदर्भात  5 जिल्ह्यांमध्ये रोज एक ऑक्सिजन टँकर पुरविण्याचे निर्देश द्यावे असा आग्रहही त्यांनी केला. सध्या या आजारासाठी उपयुक्त असणारे रेमेडीसिवर व इंजेक्शन काळ्या बाजारात विकून रुग्णांना हजारो रुपयांची लूट केली जात आहे यामुळे काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.

सरतेशेवटी आपबीती मांडताना महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील उद्रेक त्यांनी सभागृहात मांडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेला वाऱ्यावर सोडून मातोश्रीत बसुन 'माझे कुटुंब- माझी जबाबदारी' ची घोषणा करतात पण माझा महाराष्ट्र -माझी जबाबदारी असे मात्र म्हणत नाहीत. त्यांनी 80 वर्षांचे योद्धा शरद पवार साहेब यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रात फिरावे असा आग्रहही केला.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा