शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा लुटणाºया युवकाला लोकांनी बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:06 IST

मारहाण करून लूटमार करणाºया एका युवकाला नागरिकांनी बदडल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मॉडेल रेल्वेस्थानक परिसरात घडली.

ठळक मुद्देरेल्वे स्थानकानजीकची घटना : अन्य दोघे पसार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मारहाण करून लूटमार करणाºया एका युवकाला नागरिकांनी बदडल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास मॉडेल रेल्वेस्थानक परिसरात घडली. लूटमार करणाºयांपैकी दोन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी आरोपी रवि किसन खडसे (३०,रा.बेलपुरा) व तक्रारकर्ता कलीम खान अलीम खान (३५, चांदनी चौक) या दोघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.कलीम खान अलीम खान (३५) हा युवक बसस्थानक मार्गावरील अलकरीम हॉटेलमध्ये काम करतो. सोमवारी तो मर्च्युरी पॉईन्टकडून रेल्वे स्थानक मार्गाने जात असताना त्याला रवि किसन खडसे याने स्थानिक गजानन महाराज मंदिरीसमोर अडविले व रेल्वेस्थानक परिसरातील झुडूपात ओढत नेले आणि लूटमार केली.रविने १६ आॅगस्ट रोजीही केली लूटमारत्याठिकाणी रवि खडसे व त्याच्या दोन साथीदारांनी कलीमला बेदम मारहाण सुरू केली आणि त्याच्या खिशातून दोन हजार रूपये व मोबाईल जबरीने हिसकावून घेतला. हा प्रकार बघून परिसरातील काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रवि खडसेसह त्याच्या दोन्ही साथीदारांनी पलायन केले. काही नागरिकांनी रवि खडसेचा पाठलाग करून त्याला मॉडेल रेल्वेस्थानकाच्या गेटजवळच पकडले आणि मारहाण सुरु केली. या मारहाणीत रवि खडसे जबर जखमी होऊन बेशुद्ध झाला. हा गोंधळ पाहून रेल्वे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन मारहाण करणाºया नागरिकांना थांबविले.रेल्वे पोलिसांनी रवि खडसेला ताब्यात घेऊन तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच कोतवाली पोलीस ठाण्याच्या पीएसआय सुनीता काळे, पोलीस शिपाई पंकज खटे, संजय सांबळे व सुधीर भोरे यांनी घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले. तत्काळ उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. यावेळी रविद्वारे करण्यात आलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या कलीमला सुद्धा उपचारासाठी इर्विनमध्ये आणले गेले. याप्रकरणात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रकिया सुरु होती. रवि खडसे हा लुटमार करीत असल्याची तक्रार १६ आॅगस्ट रोजी रोमील प्रभाकर बनचैर्य (२६,रा. राजापेठ) याने दिली आहे.