अबब ! : ४५ हजार चौरस फूट बांधकाम विनापरवानगी अमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल महेफिल ईन व ग्रँड महेफिल या नामांकित हॉटेलचे तब्बल ४५ हजार चौरस फूट बांधकाम विनापरवानगी असल्याचे महापालिकेच्या तपासणीत प्रथमदर्शनी सिद्ध झाले. महापालिका प्रशासनाने या दोन्ही प्रतिष्ठानांना एक कोटी २४ लाख रुपयांचा दंड भरण्याचा आदेश जारी केला. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार हॉटेल महेफिल इन आणि ग्रँड महेफिलच्या बांधकामाची तपासणी दोन आठवड्यांपासून सुरू होती. तपासणी अचूक व्हावी, यासाठी वरिष्ठ प्रथम श्रेणी दर्जाचे सहायक संचालक (नगररचना) सुरेंद्र कांबळे यांच्या शिरावर या मोहिमेची धुरा सोपविण्यात आली होती. त्यांच्या चमुने दोन्ही हॉटेलचे ४५ हजार चौरस फूट बांधकाम विनापरवानगी असल्याचे हुडकून काढले. यापैकी बांधकाम अवैधदेखील आहे. हा अहवाल चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे ७ जुलै रोजी सादर झाला. ८ जुलैला त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संबंधित दस्तऐवजांवर स्वहस्ताक्षरात त्यांनी हे आदेश नमूद केले.
‘महेफिल’ला एक कोटी २४ लाखांचा दंड
By admin | Updated: July 10, 2015 00:46 IST