शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

वनकर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘पीसीसीएफ’चा हस्तक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2016 00:31 IST

गत तीन दिवसांपूर्वी अमरावती वनवृत्तातील ६९ वनरक्षक, पाच वनपाल, चार लिपीक आणि एका लेखापालांच्या बदली ...

लागेबांधे : परतवाडा वनपालांची बदली करताना ‘सीसीएफ’चा शेराअमरावती : गत तीन दिवसांपूर्वी अमरावती वनवृत्तातील ६९ वनरक्षक, पाच वनपाल, चार लिपीक आणि एका लेखापालांच्या बदली प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता बाळगली असली तरी परतवाडा येथे वनपालाची नियुक्ती ही धक्कादायक मानली जात आहे. ही नियुक्ती करताना मुख्य वनसंरक्षक (सीसीएफ) यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांच्या आदेशानुसार करण्यात येत असल्याचा शेरा नोंदविला आहे. परिणामी वनकर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये वरिष्ठांनी ढवळाढवळ केल्याचे स्पष्ट होत आहे.मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी वनवृत्तातील ६१ वनरक्षक, पाच वनपालांचे बदल्याचे आदेश जारी केले आहे. बदल्यांमध्ये पारदर्शता ठेवत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक दिनेशकुमार त्यागी यांनी मेळघाटातील वनरक्षकांना पठारी भागात आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पाच वनपालांच्या बदल्यांमध्ये परतवाडा वनपाल व्ही.आर. झामरे यांची बुलढाणा येथून झालेली नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे. परतवाडा वनपाल नियुक्तीसाठी येथील एका सहायक वनसंरक्षकांनी मध्यस्थी करुन थेट ‘पीसीसीएफ’कडे साकडे घातल्याची चर्चा वनविभागात जोर धरु लागली आहे. उर्वरित वनपालांच्या बदल्या लवकरचअमरावती : परतवाडा ही जागा वनविभागात मलईदार म्हणून सर्वश्रूत आहे. मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी परतवाडा वनपाल नियुक्तीचे आदेश निर्गमित करताना वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ‘पीसीसीएफ’चा हस्तक्षेप होता, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. परतवाडा वनपाल याच जागेसाठी ‘पीसीसीएफ’ने का आग्रह धरावा हा देखील संशोधनाचा विषय ठरु लागला आहे. वनविभागात बदल्यांमध्ये मंत्री किंवा लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप ही नित्याचीच बाब राहते. परंतु राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वनपालांच्या नियुक्तीसाठी कनिष्ठांवर दबाव आणून त्या जागी नियुक्ती करुन घ्यावी, हा प्रकार वनविभागात पहिल्यांदाच घडला आहे. वनपालांच्या बदल्या करताना किमान १५ ते २० वनपालांची रिक्त जागेवर नियुक्ती केली जाते. परंतु यावेळी पाच वनपालांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात सेवेचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या वनपालांच्या बदल्या केल्या जातील, असे संकेत आहे. मात्र मेळघाटात बदली व्हायला नको, याकरिता वनपाल राजकीय दबावतंत्र वापरत असल्याचे चित्र आहे.वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची बोलती बंदवनपाल, वनरक्षकांच्या बदल्या करताना मुख्य वनसंरक्षकांनी अत्यंत पारदर्शकतेने ही प्रक्रिया राबविली आहे. मेळघाटात वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या वनकर्मचाऱ्यांना या बदलीत न्याय दिला आहे. जे निकष वनरक्षकांसाठी लागू केले तेच निकष वनपालांच्या बदल्यांसाठी लागू करावे, अशी मागणी वनकर्मचारी संघटनांची आहे. अमरावती, बुलढाणा विभागातील वनक्षेत्राधिकारी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र यावेळेच्या बदलीत वनक्षेत्राधिकाऱ्यांना काहीच थांगपत्ता लागू न देता मुख्य वनसंरक्षकांनी बदलीची यादी तयार केली आहे.बडनेरा वनवर्तुळ महिलेसाठी राखीव?अमरावती वनविभागांतर्गत येणाऱ्या बडनेरा वनवर्तुळ हे एका महिला वनपालांसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आली. हल्ली ही महिला वरुड वनपरिक्षेत्रात कार्यरत असून वरिष्ठांना हाताशी धरुन बडनेरा वनवर्तुळ आपल्यासाठी राखीव ठेवण्यात यश मिळविले आहे. तीन वर्षांच्या सेवेचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच सोईनुसार आणि मलईदार जागा मिळावी, यासाठी ही महिला वनपाल बडनेरासाठी वरिष्ठांचे उंबरठे झिजवीत असल्याचे सूत्राकडून समजते.चांदूररेल्वेसाठी जोरदार लॉबिंगचांदूररेल्वे वनपरिक्षेत्रासाठी एका महिला वनपालांनी जोरदार लॉबिंग चालविली आहे. या महिला वनपालांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच चांदूररेल्वेसाठी वरिष्ठांकडे धावपळ सुरु केली आहे. वनपालांच्या बदल्यांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मात्र मेळघाटात बदली नको म्हणून बदलीस पात्र ठरलेल्या अनेक वनपालांनी सोयीची जागा मिळण्यासाठीची लगबग सुरु केली आहे.