शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: December 20, 2014 22:30 IST

शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव

महापालिका सदस्य आक्रमक : वाहनतळाचे अतिक्रमण हटविण्याची मागणीअमरावती : शहरातील दोन उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यासाठी ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा प्रशासनाने वेळेवर आणलेला प्रस्ताव सदस्यांनी एकजूट होत फेटाळून लावला. एवढेच नव्हे, तर वाहनतळाच्या राखीव जागेवर असलेले अतिक्रमण का हटविले जात नाही, असा सवाल उपस्थित करुन ‘भ्रष्टाचारी’ अशी उपमा देत महापालिका प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर चरणजित कौर नंदा यांच्या पीठासीनाखाली शनिवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी पीठासीनावर उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर यांनी कामकाज सांभाळले. सभेच्या प्रारंभी शहर बस समिती सदस्य नियुक्तीवरुन वादळ उठले. राष्ट्रवादीचे सुनील काळे आणि अविनाश मार्डीकर यांच्यात सदस्य निवडीच्या पत्रावरुन शाब्दिक वादही झाला. अखेर महापौरांनी राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना या गटात नेतेदाचा वाद कायम असल्याने हा विषय पुढच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्याचा निर्णय घेतला.अवैध होर्डींग्जचा मुद्दा गाजलाप्रदीप दंदे यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी असल्याचे सांगून सर्वसाधारण सभा स्थगित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र काही सदस्यांच्या मागणीवरुन संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्रांचे पूजन करुन आदरांजली वाहण्यात आली. बाजार परवाना विभागाचे प्रमुख गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रशासनाच्यावतीने उड्डाणपुलाखाली ‘पे अ‍ॅन्ड पार्क’चा विषय वेळेवर सभागृहात आणला. याला सदस्यांनी कडाडून विरोध केला. दिनेश बूब यांनी याचा विरोध करीत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच ताशेरे ओढले. राजू मसराम, सुजाता झाडे यांनी अवैध होर्डिग्ज उभारण्याबाबतचा मुद्दा मांडला. प्रदीप बाजड, अरुण जयस्वाल, प्रदीप हिवसे, अमोेल ठाकरे, अजय सामदेकर, प्रशांत वानखडे, हमीद शद्दा हे प्रशासनावर तुटून पडले. अमोल ठाकरे यांनी शाम टॉकीज जवळील वाहनतळाच्या जागेवर असलेले अतिक्रमणाबाबत न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत अधिकाऱ्यांचा अक्षरश: वर्ग घेतला. वाहनतळासाठी राखीव असलेले अतिक्रमण काढण्यासाठी काय अडचण आहे? हा मुद्दा प्रदीप बाजड, प्रदीप हिवसे यांनी रेटून धरला. बाजड यांनी जुने दाखले देत या जागेप्रकरणी झालेल्या ‘तोडी’चा विषय उपस्थित केला. मात्र आता तोडातोडीचा विषय आला. महापौर चरणजित कौर नंदा यांना सावित्रीबाई फुले, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी अशा उपमा देत आम्ही तुम्हाला मर्दानी म्हणून बघतो, असे म्हणत प्रदीप बाजड यांनी काही तरी निर्णय द्या, असे म्हणाले. मात्र ही जागा शासनाची आहे, असा न्यायालयाचा निर्णय २३ सप्टेंबर २०१४ चा आहे. मात्र अतिक्रमण धारकांना कोर्टातून स्थनगादेश आणण्याची संधी प्रशासनाने दिली, असा आरोप अरुण जयस्वाल यांनी केला. (प्रतिनिधी)