शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पे अ‍ॅन्ड पार्क, ओगलेंचा पुनर्प्रवेश गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:58 IST

राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अ‍ॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देआज आमसभा : दुपारपूर्वीच स्थगितीचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अ‍ॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत. १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता महापालिकेची आमसभा होऊ घातली असून ती प्रशासकीय विषयानंतर स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती सत्ताधिशांच्या गोटातून आली आहे.व्यावसायिक संकुलातील गाळे वितरणावरून प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये पेटलेले युद्ध पाहता आमसभेतही त्यावर रणकंदन अपेक्षित आहे. उड्डाणपुलाखालील पे अ‍ॅन्ड पार्कला भाजपच्या नगरसेवकांसह काँग्रेस, बसपा व मनसेने विरोध केल्याने पे अ‍ॅन्ड पार्क बाबतचा निर्णय आमसभेत चर्चिला जाईल. आमसभेत निर्णय न झाल्यास मनसेने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ प्रायोगिक तत्वावर ६ महिन्यांसाठीच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी बहुपक्षियांचा विरोध पाहता आमसभेत त्यावर वादळी चर्चा अपेक्षित आहे.याशिवाय तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत रूजू करण्याचा प्रस्तावही आमसभेत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने ओगले यांच्या बाजूने निर्णय दिल्याने पुढील आदेशापर्यंत ओगले यांना कामावर रूजू करून घेण्यासाठी प्रशासनाने प्रशासकीय प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर घमासान अपेक्षित आहे.प्रस्तावावर चर्चा नाहीच!मागील काही आमसभा दुपारपूर्वीच स्थगित करण्यात आल्याने विषयपत्रिकेची लांबी वाढत चालली आहे. नगरसेवकांच्या प्रस्तावावर चर्चा होत नाही. मागील वर्षभरापासून प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे बहुतांश नगरसेवकांमध्ये असंतोष असून वांझोट्या चर्चावर वेळ न घालवता प्रस्तावांवर चर्चा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, सोमवारच्या सभेतही प्रस्तावावर चर्चा होणे शक्य नसल्याचे संकेत आहेत.विषय समिती सदस्यांची घोषणामहापालिकेतील चारही विषय समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्या समिती सदस्यांची घोषणा सोमवारच्या आमसभेत केली जाणार आहे. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे ४९ सदस्यांचे पाठबळ असल्याने चारही समित्यांमध्ये त्यांच्या प्रत्येकी पाच नगरसेवकांची वर्णी लागेल. महापालिकेत विधी, शहर सुधार समिती, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती व महिला व बालकल्याण अशा चार विषय समित्या आहेत. त्यावर प्रत्येकी ९ सदस्य नव्याने पाठविले जातील.