शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

पवन महाराज पसार, आई-वडील अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:16 IST

अमरावती : अंगात देवी येण्याचे सोंग घेऊन नागरिकांची दिशाभूल करणारा कांतानगरातील पवन महाराज ऊर्फ जय भवानी पसार झाला असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना गुरुवारी अटक केली.

ठळक मुद्देघराची झडती : सीपींच्या आदेशानंतर हलले गाडगेनगर पोलीस, तीन तलवारी जप्त, अंगात देवी येण्याचे नाटक

घराची झडती : सीपींच्या आदेशानंतर हलले गाडगेनगर पोलीस, तीन तलवारी जप्त, अंगात देवी येण्याचे नाटकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगात देवी येण्याचे सोंग घेऊन नागरिकांची दिशाभूल करणारा कांतानगरातील पवन महाराज ऊर्फ जय भवानी पसार झाला असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या आई-वडिलांना गुरुवारी अटक केली. साधना अनिल घोंगडे (४०) व अनिल घोंगडे (४५) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी भोंदूबाबा पवन ऊर्फ विशाल याच्या घराची झडती घेऊन काही साहित्य जप्त केले.कांतानगरातील शासकीय वसाहतीत राहणारे रवींद्र माणिक श्रुंगारे यांच्यासह अन्य काही जणांनी पोलीस आयुक्तांंची भेट घेतली. १५ मे रोजी दिलेल्या तक्रारीवर गाडगेनगर पोलिसांनी कारवाई न केल्याची माहिती दिली. कांतानगरातील अनिल घोंगडे यांचा मुलगा पवन अंगात देवी येण्याचे सोंग करीत भोळ्याभाबड्या नागरिकांना जाळ्यात अडकवून पैसे उकळण्याचा गोरखधंदा करीत आहे. त्याला हटकले असता, तुम्हालाच करणी करेन, अशी धमकी पवन देत होता. अंगात देवी आल्याचे भासवून जोरजोराने अश्लील शिवीगाळ करणे, लिंबू, अंगारा, नारळ व पाणी देऊन नागरिकांना फसविणे, मारुतीच्या मंदिरात नेऊन भूत काढणे असे कृत्य तो करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. पवनच्या अशा कृत्याला वडील अनिल व आई साधना साथ देत असून, अशाच कारणावरून तक्रारदार रवींद्र यांच्या वडिलांना पवनने मारहाण करून जखमी केले. या धंद्यात वर्ष झाले, तू माझे काहीही बिघडवू शकत नाही, अशा धमक्या रवींद्र यांना देण्यात आल्या. पवनच्या या कृत्यांची तक्रार अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार यांनी १५ मे रोजी केली. त्यानुसार पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध महाराष्ट्र अनिष्ट रूढी प्रतिबंधक अधिनियम ५, ८ अन्वये गुन्हा नोंदविला. यानंतरही पवनने बुवाबाजी सुरूच ठेवली. अखेर गुरुवारी रवींद्र श्रुंगारे यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे पुन्हा तक्रार केली.बुवाबाजीचे साहित्य जप्त करण्याचा विसरघोंगडे महाराज नावाने प्रचलित होत असलेला पवन हा देवी अंगात येत असल्याचा आव आणून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरवित होता. गुरुवारी गाडगेनगर पोलिसांनी घोंगडे महाराजाच्या घराची झडती घेतली. तेथून तीन तलवारी जप्त केल्या. मात्र, बुवाबाजीसाठी उपयोगी पडणारे अनेक साहित्य जप्त करण्याचा पोलिसांना विसरच पडला होता. त्यांनी जाणूनबुजून ते साहित्य जप्त केले नसल्याचे आढळून आले. हळदीकुंकू लावलेला मोरांच्या पंखाचा गुच्छा, लाल धागे बांधलेले लोलक, तंत्र-मंत्र करण्याचे साहित्य, घोंगडे महाराजाचे छायाचित्र असणारे फलक, घोंगडे महाराजाचे वस्त्र आदी प्रकारचे साहित्य पोलिसांनी जप्त केले नाही.ठाणेदार मनीष ठाकरेंची सीपींनी केली कानउघाडणीपवन महाराज ऊर्फ जय भवानीच्या बुवाबाजीची तक्रार घेऊन कांतानगरातील काही नागरिक सर्वप्रथम गाडगेनगर पोलिसांकडे गेले होते. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे नागरिकांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार आणि चमूने पवनच्या घरी जाऊन भोंदूबाबाच्या कारनामे प्रत्यक्ष पाहिले. व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, त्याचा दरबार सुरूच होता. दुसरी तक्रार सीपींकडे करण्यात आली. ठाणेदार मनीष ठाकरे पवनला पाठीशी घालत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी फोनवरून ठाकरे यांची चांगलीच कानउघाडणी केली.वडिलांचा आरडाओरडाघर झडतीदरम्यान पवनचे वडील अनिल पोहोचले. जोरजोरात ओरडून पोलिसांना साहित्य जप्तीसाठी मज्जाव केला. पोलिसांना घरातील वस्तू व साहित्यांना हात लावू दिला नाही. पोलीसही अर्धवट जप्ती करून परतले. त्यावर आक्षेप घेण्यात आल्यावर मनीष ठाकरे पुन्हा जप्तीकार्य पूर्ण करण्यासाठी पोहोचले.