शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पुसलावासी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 23:22 IST

पुसला येथे भरपावसाळ्यात मागील १४ दिवसांपासून पाणीटंचाई सोसावी लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आणि त्यांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देऊन राडा केला.

ठळक मुद्देग्रामपंचायतीवर धडक : पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला

लोकमत न्यूज नेटवर्कपुसला : पुसला येथे भरपावसाळ्यात मागील १४ दिवसांपासून पाणीटंचाई सोसावी लागत असल्याने संतप्त ग्रामस्थांचा रोष उफाळून आला आणि त्यांनी थेट ग्रामपंचायतीवर धडक देऊन राडा केला. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांसह सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायतीत पोहोचल्याने बाकाप्रसंग टळला.पुसला हे १५ हजार लोकवस्तीचे गाव आहे. मातब्बर राजकारण्यांचे हे गाव समजले जाते. परंतु येथे अनेक गैरसोयी आहेत. विशेष म्हणजे येथील पेयजलचा प्रश्न, तर नेहमीच ऐरणीवर असतो. यंदासुद्धा उन्हाळयापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिक पाणीटंचाईला कंटाळले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास ग्रामपंचायत अयशस्वी ठरत आहे. मागील १४ दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संतप्त झाले होते अखेर ग्रामस्थांचा असंतोष उफाळून आला.गुरुवारी सकाळी ११ वाजता शेकडोे ग्रामस्थ ग्रामपंचायतीवर चालून गेले. यावेळी ग्रापंमध्ये केवळ सचिव उपस्थित होते. नियमीत पाणी पुरवठा करा अन्यथा राजीनामे द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. नागरिकांचा असंतोष पाहता मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेंदूरजनाघाटचे ठाणेदार शेषराव नितनवरे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले. पोलीस पोहोचल्याचे पाहून सरपंच आणि उपसरपंचही पोहोचले. पोलिसांसह गटविकास अधिकारी राठोड यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला.