शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पटवारी संघाचा असहकार आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: January 12, 2015 22:43 IST

शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

अमरावती : शासन परिपत्रकाप्रमाणे व आदेशाप्रमाणे अंमलबजावणी न झाल्यामुळे विदर्भ पटवारी संघाने आता याविरोधात असहकार आंदोलन सुरू करण्याचा इशारा सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदनाद्वारे दिला आहे. विदर्भ पटवारी संघाच्या शासन मान्य मागण्या व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनसुद्धा तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर अन्याय केला जात आहे. यामुळे आता पटवारी संघाने १२ जानेवारीपासून असहकार आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनानुसार तलाठ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तलाठी यांनी अतिवृष्टी व गारपीटची सन २०११-१२ व २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या अनुदानानित ०.०५ टक्के रक्कम कामाचा मेहताना अद्यापपावेतो दिला नाही, जिल्ह्यामध्ये सन २०१४ पर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावर व्यवस्थेबाबतची तलाठी, मंडळ अधिकारी यांचे देयके व मानधन द्यावे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना १२ व २४ वर्षांवरील कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा, शासनाने जून २०१३ ची परिपत्रकाप्रमाणे तलाठी यांना कार्यालयीन भाडे देण्यात आले नाही, त्यामुळे तलाठ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, अशा विविध मागण्यांना घेऊन विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाभरात असहकार आंदोलन सुरू करण्यात आल्याने आता प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. पटवारी संघाच्या मागण्यांबाबत तातडीने विचार करावा, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत, एस.डी. ढोक, आर. बी. आवटकर, संतोष चवरे, प्रदीप पिंजरकर, आर. एम. पिल्ले, एस.जी. मिश्रा, जे.डी. मालपे, पी.एम. ठाकरे, जे.डी. महल्ले, बोरकर आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)