पोलिसांचे नियोजन कोलमडले : प्रजासत्ताक दिनी नागरिकांचा संताप, मोर्शी रोडवर अनेकांची 'तू-तू मै-मै'अमरावती : अमरावती : एकीकडे देशभक्तीचा अपार उत्साह तर दुसरीकडे तुंबलेली वाहतूक आणि पोलिसांची अरेरावी यामुळे संतप्त झालेले नागरिक, अशी विचित्र स्थिती प्रजासत्ताक दिनी जिल्हा स्टेडियमसमोरील मार्गावर होती. पोलिसांचे वाहतूक नियोजन साफ कोलमडल्याचे चित्र दुपारपर्यंत मोर्शी रोडवर बघावयास मिळाले. पालकमंत्र्यांच्या धोरणाला खोप्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलाच्या विस्तिर्ण प्रांगणावर झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजवंदनेसाठी पालकमंत्री प्रवीण पोटे आले होते. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या वाहनाचा ताफा आरक्षित रस्त्यावरून विनासायास प्रांगणापर्यंत पोहचविण्यात आला. मात्र, त्याचवेळी राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, मुलांचे कौतुक बघण्यासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि निमंत्रितांना कमालिचा त्रास सहन करावा लागला. सामान्यांना जराही त्रास होऊ नये, असे वारंवार निक्षूण सांगणाऱ्या पालकमंत्री पोट यांच्याच धोरणाला यावेळी पोलिसांनी खो दिला. पोलीस खात्याने पंचवटी ते इर्विनकडे जाणारा मार्ग बंद केला होता. ये- जा करण्यासाठी इर्विन ते पंचवटी हा एकेरी वाहतुकीचा मार्ग उपलब्ध होता. शाळा-महाविद्यालयांचा तसेच दक्षिण-पूर्वेकडील शहरातून मध्यवस्तीत येणारा हा महत्त्वपूर्ण मार्ग असल्यामुळे वाहनांची गर्दी झाली. स्टेडियमवरील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणारा सामान्यांचा सारा लोंढा केवळ याच एकमेव मार्गाने येऊ शकणार होता. महाविद्यालयीन बसेस, इतर चारचाकींचे ये-जा आणि दुचाकींचा रेटा यामुळे वाहतूक सतत तुंबलेलीच होती. विधि महाविद्यालयाच्या प्रागंणात केलेली पार्किंगची व्यवस्था पोलिसांच्या अनियोजनामुळे दुष्काळात तेरावा महिना ठरली. पीआय श्रेणीच्या अधिकाऱ्यांसह सारेच पोलीस जत्थ्याने उभे होते. रस्त्यावर वेगवेगळ्या पॉईन्टवर उभे राहून वाहतूक सुरळीत करून त्यांना गुदमरलेली वाहतूक मोकळी करता आली असती. पार्किंगकडे जाणारी वाहने रस्ता अडवून धरत होती.
देशभक्ती उत्साहावर 'ट्रफिक जाम'चे विरजण!
By admin | Updated: January 28, 2016 00:16 IST