शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अपस्मारच्या रुग्णांना विश्वास देणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:49 IST

अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देश्रीकांत शिंगणे : विविध उपाय उपलब्ध

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपस्मार यालाच फीट किंवा मिरगीचा आजार संबोधले जाते. हा दीर्घकालीन मज्जारज्जूचा आजार असून, भारतात सुमारे ५ दशलक्षाहून अधिक नागरिक याने ग्रस्त आहेत. फीट येणारे व्यक्त हे सामान्य व्यक्तीच असून, त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे. या आजाराबाबत अनेक गैरसमज असून, ते दूर व्हावे त्यांना जगण्यास आत्मविश्वास मिळावा, हाच यामागील उद्देश आहे, असे दिशा फौंडेशनचे डॉ. श्रीकांत शिंगणे यांनी जागतिक अपस्मारदिनी आयोजित कार्यक्रमात सांगितले.लाखभर अपस्मार रुग्ण वैद्यकीय उपचारांना दाद देत नसल्याने लँडमार्क एसईएलपी ग्रुप अमरावती, अकोला येथील दिशा फाऊंडेशनच्या सहकार्याने संपूर्ण राज्यभर जनजागृती अभियान राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी जसे बस स्थानक, रेल्वे स्थानकांवर १७ नोव्हेंबरपासून जागृती करण्यात येत आहे. अपस्मार या आजाराच्या रुग्णाबाबत भीती नव्हे, तर सहानुभूती आणि कणव बाळगण्याची आवश्यकता आहे.या करा उपाययोजनाफीट आल्यास तोंडात कांदे, चपला किंवा वस्तू कोंबू नये, श्वास कोंडणार नाही याची काळजी घ्यावी, पोहणे टाळावे, अग्नीजवळ जाण्याचे टाळावे, वाहन चालवू नये, झाडावर चढू नये, भयभीत होऊ नये, ओळखपत्र नेहमी सोबत बाळगावे, अशा स्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांनी न्यूरोलॉजिस्टशी संपर्क साधून उपचार करावे.आजाराची लक्षणेझटके, चेहऱ्याला कंप, हात-पाय थरथरणे, लक्ष विचलित होणे, शरीर वेडेवाकोडे होऊन शुद्ध हरपणे आदी अपस्माराची लक्षणे आहेत.एक ते तीन मिनिटांचा काळअपस्मारग्रस्तांना फीट एक ते तीन मिनिटांपर्यंत राहते. त्यादरम्यान तोंडातून फेस येणे, श्वास गुदमरणे, असुरक्षित जागेवर पडल्यास इजा पोहचते. तसेच हा कालावधी वाढल्यास मेंदूला इजा होण्याची शक्यता असते.औषधोपचार अनिवार्यअपस्मार हा जिवावर बेतणारा आजार असून, यातून सुटका मिळण्यासाठी रुग्णांना किमान दोन ते पाच वर्षे औषधोपचार घेणे अनिवार्य आहे. तोसुद्धा सुयोग्य पद्धतीने व वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावा. बहुतांश रुग्णांना या अपस्मार आजारातून मुक्तता मिळाल्याची माहिती आहे.