नरेंद्र जावरे चिखलदराकुठल्याच प्रकारची सुटी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देता हजेरी रजिस्टरवर थेट ३० जूनपर्यंत उपस्थित असल्याची स्वाक्षरी करुन डॉक्टरांनी पळ काढला. तालुक्याच्या चुरणी ग्रामीण रुग्णालयातील या संतापजनक प्रकाराचा गावकऱ्यांनी पंचनामा केला. या संपूर्ण प्रक्रियेने मेळघाटातील आरोग्य यंत्रणेचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे.मेळघाटात पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे शासनाकडून सांगण्यात येते. परंतु ४२ आदिवासी गावांची जबाबदारी असलेल्या चुरणी ग्रामीण रुग्णालयाचा दावा फोल ठरला आहे.बुधवारी चुरणी येथे आठवडी बाजार भरतो. त्यासाठी आसपासच्या खेडे-गावातील आदिवासी मोठ्या प्रमाणात बाजार करण्याच्या उद्देशाने चुरणी येथे येतात. सोबतच काही दुखण्यावर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करुन घेतात. नेहमीप्रमाणे आदिवासी बुधवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तेथे गेल्यावर दुपारी १२ वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित नसल्याने घटनेचे बिंग फुटले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळेच मेळघाटसारख्या आदिवासीबहुल भागात आरोग्य यंत्रणेचा पार बोजवारा उडाला आहे. परिणामी मेळघाटात कुपोषणासारख्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.
रुग्ण, दवाखाना सोडून डॉक्टरांनी काढला गावी पळ
By admin | Updated: June 26, 2015 00:31 IST