शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘पतीराज’पुढे अधिकारी हतबल

By admin | Updated: April 22, 2017 00:23 IST

जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा जेमतेम कारभार सुरू झाला असताना ‘पतीराज’ हस्तक्षेप वाढला आहे.

शासन निर्णयाला छेद : कशासाठी खपवून घेतात मुजोरी अमरावती : जिल्हा परिषदेतील नव्या पदाधिकाऱ्यांचा जेमतेम कारभार सुरू झाला असताना ‘पतीराज’ हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे पदाधिकारी महिला की पुरूष हे अधिकाऱ्यांनाही कळू शकत नाही. नेमके कुणाचे ऐकावे या व्दिधावस्थेत अधिकारी आले आहेत. मात्र शासन निर्णयानुसार ‘पतीराज’ हस्तक्षेप नको असे असतानाही अधिकारी कशासाठी हतबल होतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हा परिषदेत नव्यानेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदावर वनिता पाल यांची नियुक्ती झाली आहे. मात्र त्याच्यासाठी जुन्या वाहनाऐवजी नवीन वाहन मिळविण्यासाठी प्रशासनालातील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना श्रीपाल पाल यांनी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांच्या माध्यमातून ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केले. यासाठी श्रीपाल पाल यांची बाजू घेत उपाध्यक्ष ढोमणे यांनीही संबंधित अधिकाऱ्याला ‘वाहन द्या ; नाही तर माझे वाहन देऊन मीच पायी जातो’ असा दम भरत अधिकाऱ्यांना नियम डावलून महिला व बालकल्याण समिती सभापतींना अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या नावाने असलेले एमएच २७ अ‍े.अ‍े ६५२ क्रमांकाचे वाहन देण्यास दबाब तंत्राचा वापर वाहन मिळवून दिले. मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यानंतर अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी हे महत्वाचे पद आहे. हा विषय त्यांचे पती श्रीपाल पाल यांनी अधिकारी व उपाध्यक्षांपर्यत नेऊन नियुक्तीच्या दिवसापासूनच सभापतींच्या कामकाजात हस्तक्षेप करत रेटून धरला. एकीकडे शासनाने महिलांच्या सबलीकरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखिव असल्याची तरतूद केली. मात्र याचा फायदा हा महिला पदाधिकाऱ्यांन पेक्षा पतीराजच अधिक करत असतील तर शासन निर्णय, धोरणाचा उपयोग तरी काय? या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे. त्याच यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ‘पतीराज’ सारख्या बिनधिकत वावणाऱ्या समोर का म्हणून झुकावे हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनात काम करतांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून कायदा,नियम,धोरण यांचा वापर केल्यास पतीराज सारख्या प्रकारांना आळा बसू शकेल अन्यथा असे प्रकार हे दिवसेदिवस कमी होण्यापेक्षा जास्त होतील हे मात्र नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला तर ही डोकेदुखी कायमची मोडीत निघू शकते.