शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी समृद्धीचा मार्ग

By admin | Updated: August 13, 2016 23:56 IST

महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पालकमंत्री : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी अमरावती : महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाची गंगोत्री ठरणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. शासनाच्या हमीसह या प्रकल्पात भागीदार व्हावे, अशी संकल्पना आहे. हा राज्यातील एकमेव प्रकल्प असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. या समृद्धी महामार्गामुळे राज्यातील २४ जिल्हे एकमेकांशी जोडले जाणार आहेत. प्रत्यक्ष १० जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. तासी १५० कि.मी. अशी या मार्गावर वेगमर्यादा राहणार आहे. यामध्ये नागपूर ते मुंबई हे अंतर केवळ १६ तासांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ८११ हेक्टर जमिनीचे भूसंचयन करण्यात येणार आहे. भूसंपादनाचाही पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असला तरी शेतकऱ्यांनी भूसंचयन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये कृषी समृद्धी केंद्र ही एक नवीन वसाहत राहणार आहे. या प्रकल्पात एखाद्या शेतकऱ्याची एक हेक्टर जमीन भूसंचयन केल्यास ती एक लाख १० हजार स्क्वेअर फूट होते व एका एकराची ४४ हजार फूट होते. याची नुकसान भरपाई शासन १० वर्षांमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना जिरायती क्षेत्रासाठी ३० टक्के जागा म्हणजेच ३३ हजार स्केअर फूट जागा मालकी हक्काने देणार आहे. या जागेची किंमत रेडीरेकनर दरानुसार २५६ रुपये स्क्वेअर फूट म्हणजेच ८४ लाख ४८ हजार रुपयांची ही जागा राहणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासाठी २७ हजार ५०० फूट जागेचे २५६ स्क्वेअर फूट दरानुसार ७० लाख ४० हजार रुपये किंमत होत आहे. शेतकरी रस्त्यावर येऊ नये, अशी शासनाची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले. या किमतीमध्ये दरवर्षी ९ टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच एका शेतकऱ्याला १० वर्षांत दीड कोटी किमतीची हमी शासन देत आहे. हे कृषी समृद्धी केंद्र एमएसआरडीसी विकसित करणार आहे. १ जानेवारीला प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन २०१९ पर्यंत या मार्गावरून वाहने धावणार आहेत. काही व्यक्ती या प्रकल्पाचा अपप्रचार करीत आहेत. मात्र शासन जर या प्रकल्पात भागीदार होत आहे तर नुकसान कसे होणार, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भूसंचयन म्हणजे काय ? एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन किंवा जमीन अधिग्रहण केली जाते. तेव्हा जमीन मालकाला काही पर्याय नसतो. त्याच्या सातबारावर शिक्का येतो आणि जमीन विकण्याचीही मुभा राहत नाही. एकरकमी मोबदला मिळतो. रेडीरेकनरमधल्या शासकीय किमतीचा पावणेचारपट मोबदला मिळतो. शासनाचे भूसंचयन करण्याच्या योजनेमुळे भूधारकाचे अनेक फायदे होणार आहेत. एकरकमी मोबदला मिळत नाही, हे खरे. पण त्यापेक्षाही भूसंचयन अधिक फायद्याचे ठरते. यात शेतकऱ्यांची जेवढी जमीन तो शासनाच्या हवाली करतो, त्या जमिनीच्या पावपट एवढी विकसित बिनशेती (एन.ए.) जमीन त्याला पूर्ण मालकी हक्काने मिळते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. असे आहेत भूसंचयनाचे फायदे शेतकऱ्यांनी जमीन भूसंचयन करताच त्यांना कृषी समृद्धी केंद्रामधील भूखंडाची विनाअट मालकी दिली जाणार आहे. यावर दहा वर्षे वाढते अनुदान आहे. दहा वर्षांनंतरच्या किमतीची हमी शासन देत आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जमिनीच्या सातबाऱ्यावर कुठलाही शिक्का राहणार नाही. याच केंद्रात शेतकरीपुत्रांसाठी मोफत आयटीआय प्रशिक्षण, सर्वप्रमुख शहरांतील बाजारपेठेला जोडणारी व्यवस्था, शाळा, कॉलेज, दवाखाना, पोलीस ठाणे, पोस्ट, वाहतूक आदींची सोय राहणार आहे. या शहरात मोठे रस्ते, सांडपाणी, व्यवस्थापन, मुबलक पाणी, वीज, बगीचे व क्रीडांगणे राहणार आहे. याच सोबत उद्योग, कारखाने, सेवा, हॉटेल्स, बाजारपेठ, दुकाने, पेट्रोल तसेच शीतगृह, वरवारी, शेतीमाल प्रक्रिया केंद्र, फळप्रक्रिया केंद्र, माती तपासणी केंद्र राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.