शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरकडे जाणाºया प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:21 IST

एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे....

ठळक मुद्देअंजनगाववासीयांची मागणी : अकोला-महू ब्रॉडगेज मार्ग पूर्ण करा

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : एकेकाळी दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा एकमेव पूर्णा-अकोला-महू (इंदूर) हा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये परिवर्तीत करण्याच्या कामात विविध अडचणी येत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक गावांचा विकास मंदावला असल्याची ओरड होेत आहे. जे अंतर रेल्वेने २०० रुपयांत पार करता येते, त्यासाठी प्रवाशांना आठशे ते हजार रुपये खर्च करावा लागत आहे.इंदूरजवळील महूपासून खंडवाकडे येणाºया चोरल स्टेशनपर्यंत भूसंपादनात येणारे अडथळे आणि पहाडी क्षेत्रात ट्रॅक निर्मितीची समस्या यामुळे हे काम सध्या रखडले आहे. पश्चिम विदर्भातील रेल्वे मार्गावर एक प्रमुख स्टेशन असलेल्या अकोलापासून अकोटमार्गे इंदूर मध्यप्रदेशला जाणारा व प्रवाशांच्या खिशाला परवडणारा हा रेल्वेमार्ग यामुळे बंद पडला आहे. महू ते खंडवा मार्गावर पाताळपाणी या स्टेशनपासून चोरल स्थानकापर्यंत ही रेल्वे नवीन मार्गाने वळविण्यात येत आहे व त्यामुळे १५ किलोमीटरचे अंतरसुद्धा वाढले आहे.महू ते खंडवा हे अंतर जुन्या मार्गाने ११८ किलोमीटर आहे. मात्र नव्या वळणामुळे १३३ किलोमीटर होत आहे. नवीन वळणमार्ग करताना ही रेल्वे लाइन पाताळपाणीपासून बेडीदा गावाकडे वळविण्यात येते. हे वळण ४० किलोमीटर होते. जुन्या मार्गाने ते २५ किलोमीटर होते. त्यामुळे हा मार्ग १५ किमीने वाढला आहे. यासाठी किती वेळ लागेल? भूसंपादन प्रक्रिया कधी संपेल? याबाबत रेल्वे विभाग मौन बाळगून असल्याने दोनशे रुपयांत या मार्गे इंदूरला जाणाºया प्रवाशांना ट्रॅव्हल्सने पाचशे रुपयाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.सर्वोत्कृष्ट रेल्वे इंजिनीअरिंगचा नमुनाब्रिटिशकालीन रेल्वेमार्ग आगळीवेगळी सिग्नल सिस्टीम असलेला पूर्णा-अकोला ते महू इंदूर मीटरगेज रेल्वेमार्ग शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश शासनाने बांधला होता. सातपुडा पर्वताच्या घनदाट जंगलातून नद्या-डोंगरांचे अडथळे दूर करीत बांधलेला हा मार्ग तत्कालीन उत्कृष्ट इंजिनीअरिंगचा नमुना आहे.इंदूर ही रेडिमेड कापड, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रिकल्स वस्तूंची मध्य भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. यामुळे तालुका व लहान जिल्ह्यातील व्यापारी इंदूरहून व्यवहार करतात. अकोला ते महू मार्ग सुरू झाल्यास योग्य सोय होईल. बाजार विकसित होतील.- ब्रिजमोहन झंवर,अध्यक्ष, व्यापारी संघ, अंजनगावसध्या अंजनगाव किंवा पश्चिम विदर्भातील नागरिकांना ट्रॅव्हल्सनेच इंदूरला जावे लागते. विशेषत: मालवाहतूक करताना मोठा खर्च होतो. भाड्यापोटी होणारा मोठा खर्च रेल्वेमार्ग झाल्यास वाचू शकतो. प्रवाशांना बसणारा भुर्दंड वाचू शकेल.- महेंद्र शिंदी जामेकर,अंध्यक्ष, ग्राहक पंचायत, अंजनगाव