शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारावी फेरपरीक्षेत पास; प्रवेशाचे काय ?

By admin | Updated: September 1, 2016 00:19 IST

बारावी फेरपरीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर झाला आणि अनेकांच्या ‘नापास’चा शिक्का पुसला गेला.

प्रतीक्षा : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लागली चिंताअमरावती : बारावी फेरपरीक्षेचा निकाल २४ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर झाला आणि अनेकांच्या ‘नापास’चा शिक्का पुसला गेला. दुसरीकडे महाविद्यालयीन प्रवेशाची मुदत संपली आहे. त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या प्रवेशाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची मुख्य परीक्षा झाली आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर झाला. या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने मंडळाने नऊ ते २९ जुलैदरम्यान फेरपरीक्षा घेतली आणि आॅनलाईन निकाल जाहीरही झाला त्यात अमरावती विभागातून १० हजार १३८ पैकी १ हजार ८७३ विद्यार्थीच उत्तीर्ण झाले. मार्च २०१६ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया जून, जुलै मध्ये घेण्यात आली. याशिवाय कृषी व अकृषी विद्यार्थ्यांनी सुद्धा कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रक्रिया पूर्ण करीत महाविद्यालयात अध्यापन सुरू केले. विशेष म्हणजे बहुतांश विद्यापीठांच्या परीक्षा शुल्काची अंतिम मुदतही संपली आहे तर दुसरीकडे पदवी प्रथम वर्षाची प्रथम सत्र परीक्षाही आता जवळ आली आहे. प्रवेश प्रक्रियेची मुदत संपल्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेश कसा घ्यावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.