शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट कालव्याचे पाणी उठले शेतकऱ्याच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:30 IST

अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे.

ठळक मुद्देतीन वर्षात शेकडो तक्रारी : पाटबंधारे विभागाची हेकेखोरी

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अपुऱ्या कालव्याच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात पाणी संत्राबागेसह शेतात शिरून त्याचा तलाव होत आहे. परिणामी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार तब्बल तीन वर्षांपासून संबंधित विभागाला शेतकऱ्याने केली. परंतु, हेकेखोर अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धामणगाव गढी येथील योगेश डांगे या शेतकऱ्याने केला आहे.अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी हे गाव मेळघाटच्या पायथ्याशी वसलेले आहे. परिसरातील चंद्रभागा प्रकल्पाचे पाणी कालव्यातून शेतकºयांना ओलितासाठी देण्यात येते. मात्र, कालव्याचे बांधकाम अर्धवट करण्यात आल्याने ओलितासाठी सोडण्यात आलेले पाणी थेट शेतात शिरून तलाव होत आहे. धामणगाव गढी येथील शेतकरी योगेश साहेबराव डांगे यांनी सदर प्रकाराबद्दल २० नोव्हेंबर २०१४ ते आतापर्यंत मध्यम लघू पाटबंधारे विभाग, अचलपूरसह जिल्हाधिकाºयांना पत्र दिले. मात्र, त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. नेहमीप्रमाणे आश्वासनाची खैरात देत त्यांची बोळवण करण्यात आल्याचा अनुभव त्यांना आला आहे.माझी चूक काय नुकसान भरपाई द्याअर्धवट कालवा बांधून त्याचे पाणी शेतात सोडल्याने मागील तीन वर्षांत मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई आपण मिळावी आणि शेतात शिरणारे पाणी कालवा पूर्ण करून बंद करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात या गरीब शेतकºयाने केली आहे.कोण देणार न्याय?मी अल्पभूधारक शेतकरी आहे. न्याय मागण्यासाठी मागील तीन वर्षांपासून कार्यालयात चपला झिजल्या. सोबत कागदी घोडे नाचविले. मात्र, पदरी निराशाच आली. शेतात पाणी शिरत असल्याने संत्रा झाडांची वाढ खुंटली आहे, तर इतर पिके सडल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. सरकार मायबाप शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगते. मात्र, त्यांचे प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांच्या जिवावर उठल्याचा प्रकार धामणगाव गढी येथे उघडकीस आला आहे. कोण देणार न्याय, हाच सवाल योगेश डांगे या अल्पभूधारक शेतकºयाने विचारला आहे.